चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीवर कुऱ्हाडीने वार

By Admin | Updated: February 4, 2017 00:40 IST2017-02-04T00:38:40+5:302017-02-04T00:40:39+5:30

लातूर : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने कुऱ्हाडीने वार केल्याची घटना तालुक्यातील मुरुड येथे घडली

Chorus suspects | चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीवर कुऱ्हाडीने वार

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीवर कुऱ्हाडीने वार

लातूर : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने कुऱ्हाडीने वार केल्याची घटना तालुक्यातील मुरुड येथे घडली. याप्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात शुक्रवारी पतीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ जखमी महिलेवर लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरु आहेत़
मुरुडच्या ठोंबरे नगरातील गणेश भोसले हा पत्नी प्रभा उर्फ सुनीता गणेश भोसले यांच्याशी नेहमी तंटा करीत असे़ दरम्यान, बुधवारी रात्री ८ वा़ च्या सुमारास तो घरी आला आणि पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली़ तेव्हा सुनीता यांनी शिवीगाळ करु नका, असे म्हटले असता घरातील कुऱ्हाडीने त्यांच्या डोळ्याच्या वरील बाजूस आणि दोन्ही हातांवर वार केले़ त्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या़
दरम्यान, त्यांना उपचारासाठी लातूरच्या सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी उनवणे यांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली़
याप्रकरणी सुनीता भोसले यांच्या जबाबावरुन पती गणेश भोसले याच्याविरुध्द मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ अद्याप आरोपीस अटक नसल्याचे पोलिसांनी सांगितले़ (प्रतिनिधी)

Web Title: Chorus suspects