आवड पाहूनच करिअर निवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:02 IST2021-05-17T04:02:11+5:302021-05-17T04:02:11+5:30

डॉ. इं. भा. पाठक महाविद्यालयातर्फे "दहावीनंतर शाखा निवड" याविषयी नुकतेच वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. ॲड. डॉ. कल्पलता ...

Choose a career based on your passion | आवड पाहूनच करिअर निवडा

आवड पाहूनच करिअर निवडा

डॉ. इं. भा. पाठक महाविद्यालयातर्फे "दहावीनंतर शाखा निवड" याविषयी नुकतेच वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. ॲड. डॉ. कल्पलता पाटील भारस्वाडकर अध्यक्षस्थानी होत्या. दरम्यान, डॉ. गीत यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि प्रत्येक शाखेत कोणकोणत्या संधी आहेत, याविषयी माहिती दिली.

शिक्षण कुठेही थांबलेले नाही. फक्त त्याचे स्वरूप बदलत आहे, असे सांगत प्राचार्या डॉ. वसुधा पुरोहित यांनी बदलत्या शिक्षण पद्धतीविषयी चर्चा केली, तर आपली इच्छा, आवड मुलांवर लादू नका, असे आवाहन ॲड. डॉ. भारस्वाडकर यांनी पालकांना केले. झोपेत स्वप्न पाहू नका, जागेपणी स्वप्नांचा पाठलाग करा, असेही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. पर्यवेक्षिका प्रा. माधुरी भावसार यांनी प्रास्ताविक केले. प्रा. अविनाश खाडे यांनी शारदास्तवन गायले. प्रा. किरण भोरे यांनी अतिथींचा परिचय करून दिला. प्रा. उषा जोशी यांनी आभार मानले.

Web Title: Choose a career based on your passion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.