पुनर्विकासासाठी रेल्वेस्टेशनची निवड

By Admin | Updated: December 8, 2015 00:10 IST2015-12-07T23:59:08+5:302015-12-08T00:10:59+5:30

औरंगाबाद : औरंगाबादचे मॉडेल रेल्वेस्टेशन हे दक्षिण मध्य रेल्वेमधील महत्त्वाचे रेल्वेस्टेशन आहे. भारतीय रेल्वेने या रेल्वेस्टेशनची पुनर्विकास योजनेमध्ये निवड केली आहे.

The choice of railway station for redevelopment | पुनर्विकासासाठी रेल्वेस्टेशनची निवड

पुनर्विकासासाठी रेल्वेस्टेशनची निवड


औरंगाबाद : औरंगाबादचे मॉडेल रेल्वेस्टेशन हे दक्षिण मध्य रेल्वेमधील महत्त्वाचे रेल्वेस्टेशन आहे. भारतीय रेल्वेने या रेल्वेस्टेशनची पुनर्विकास योजनेमध्ये निवड केली आहे.‘पीपीपी’ मॉडेलमध्ये रेल्वेस्टेशनचे सौंदर्यीकरण आणि व्यावसायीकरण होणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या अपेक्षांवर पूर्णपणे उतरेल आणि भारतीय रेल्वेच्या उत्पन्नातही मोठी वाढ होईल, असे दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रवींद्र गुप्ता म्हणाले.
औरंगाबाद रेल्वेस्टेशनची सोमवारी पाहणी केल्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. विभागांमधील तांत्रिक बाबी, प्रवाशांच्या सोयी-सुविधा, नियमांचे पालन इ. बाबी पडताळून पाहण्यासाठी तसेच लोकप्रतिनिधींच्या मागण्या जाणून घेण्यासाठी निरीक्षण केले जात असल्याचे ते म्हणाले. रेल्वेस्टेशनवर मल्टिफंक्शनल कॉम्प्लेक्स बनविण्यात आले आहे. यामध्ये शॉपिंग एरिया विकसित केला जात आहे. रेल्वेस्टेशनवरील विश्रामगृहास प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नाही. परंतु हॉटेलच्या तुलनेत ते किफायतशीर असल्याचे गुप्ता म्हणाले.
विभागात भेदभाव नाही
दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहे, असे संघटनांकडून आरोप होतात. यावर गुप्ता म्हणाले, दक्षिण मध्य रेल्वेला सर्व विभाग सारखेच आहेत. नियमानुसार आवश्यक असणाऱ्या सुविधांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल.
‘डीएमआयसी’च्या दृष्टीने प्रयत्न
‘डीएमआयसी’मुळे आगामी काळात प्रवाशांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे येथून अधिकाधिक शहरांबरोबर कनेक्टिव्हिटी वाढविण्याची गरज आहे. परंतु येथे पीटलाईन नाही. त्यादृष्टीने प्रयत्न केला जाईल, असे गुप्ता म्हणाले.

Web Title: The choice of railway station for redevelopment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.