चितेगाव ग्रामपंचायत निवडणूक झाली चुरशीची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:05 IST2021-01-16T04:05:57+5:302021-01-16T04:05:57+5:30
चितेगाव : येथील ग्रामपंचायतीची निवडणूक खूपच चुरशीची झाली. १७ ग्रामपंचायत सदस्यांपैकी २ जागा बिनविरोध झाल्याने १५ जागेसाठी ...

चितेगाव ग्रामपंचायत निवडणूक झाली चुरशीची
चितेगाव : येथील ग्रामपंचायतीची निवडणूक खूपच चुरशीची झाली. १७ ग्रामपंचायत सदस्यांपैकी २ जागा बिनविरोध झाल्याने १५ जागेसाठी दोन पॅनल मध्ये काट्याची टक्कर दिसून आली. चुरशीच्या निवडणूकीत ३९ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले.
ग्रामपंचायतीच्या सहा प्रभाग मध्ये ५८७८ मतदान पैकी ४९७८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याने येथे ८४ . ६८ टक्के मतदान झाले. कोण बाजी मारणार लक्ष आता मतमोजणीकडे लागले आहे.
सहा प्रभाग असलेल्या या निवडणुकीत ३९ उमेदवारांनी आपले नशीब आजमावले आहे. या निवडणुकीत आजी माजी ९ सदस्य व एक माजी उपसभापती निवडणूक रिंगणात उतरले होते. चितेगाव विकास एकता पॅनल व जनसेवा विकास पॅनल मध्ये सरळ लढत झाली. मतदान प्रक्रीय शांततेत पार पाडण्यासाठी तलाठी हसन सिद्दीकी, बबन साबळे, पोलीस पाटील जनार्दन नरवडे, बिडकीन पोलीस ठाण्याचे नरेश मस्के आदी लक्ष ठेऊन होते.