जायकवाडीत ८० प्रजातींच्या पक्ष्यांचा किलबिलाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:04 AM2021-03-01T04:04:47+5:302021-03-01T04:04:47+5:30

या अभियानाअंतर्गत जायकवाडी येथील १२ ठिकाणी पक्षी अभ्यासक आणि वन खात्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी पाहणी केली. सांडपाण्याचे ...

The chirping of 80 species of birds in Jayakwadi | जायकवाडीत ८० प्रजातींच्या पक्ष्यांचा किलबिलाट

जायकवाडीत ८० प्रजातींच्या पक्ष्यांचा किलबिलाट

googlenewsNext

या अभियानाअंतर्गत जायकवाडी येथील १२ ठिकाणी पक्षी अभ्यासक आणि वन खात्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी पाहणी केली. सांडपाण्याचे वाढलेले प्रमाण, गाळपेरे, अवैध मासेमारी यामुळे मागील चार वर्षांपासून पक्ष्यांचे येणे लक्षणीय संख्येने कमी झाले आहे. पूर्वी लाखोंच्या संख्येने पक्षी यायचे, ते प्रमाण आता काही हजारांवर आले आहे, असे पक्षीतज्ज्ञ डॉ. किशोर पाठक यांनी सांगितले.

रोहित म्हणजेच फ्लेमिंगो यांच्यासह नयनसारी बदक, नकटे बदक, कृष्णक्रौंच या गणनेदरम्यान दिसलेच नाहीत. चक्रवाक्‌, थापट्या, मलिंग बदक, धनवर बदक, वारकरी, वटवटे, मत्सगरूड, पाणकावळे, दलदल ससाणा, तुतवार, चिखल्या, गळाबंद पाणलावा, पाणटिवळा, काळ्या डोक्याचा कुरव, नदी सुरय, धोबी, तुतवार, पाणलावे, पाणटिटवे, सुरय, पाणभिंगरी, माळभिंगरी या पक्ष्यांची नोंद पक्षीमित्रांकडून करण्यात आली. यातील काही पक्षी स्थानिक, तर काही स्थलांतरित आहेत.

डॉ. पाठक यांच्यासह पक्षीमित्र वसीम काद्री, उपवनसंरक्षक विजय सातपुते, वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास गिते, सहायक उपवनसंरक्षक राजेंद्र नाळे, हटकर, डी. यु. गाडगीळ, थोरात यांची यावेळी उपस्थिती होती.

चौकट :

जायकवाडी येथे दिसून येणाऱ्या पक्ष्यांची संख्या दरवर्षी रोडावते आहे. मानवी हस्तक्षेप कमी करणे, गारपेऱ्यांमध्ये झाडांची संख्या वाढविणे, पाण्यात प्लास्टिक, थर्माकॉल अशा हानिकारक गोष्टी न टाकणे, पक्षी बसण्याच्या जागेवरून मच्छिमारांनी न जाणे, यासारखे नियम पाळण्याची गरज असल्याचे डॉ. पाठक यांनी सांगितले.

फोटो ओळ :

पट्टेरी हंस

कांडेसर पक्षी

Web Title: The chirping of 80 species of birds in Jayakwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.