शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
4
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
5
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
6
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
7
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
8
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
9
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
10
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
11
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
12
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
13
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
14
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
15
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
16
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
17
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
18
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
19
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
20
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं

चीनच्या कंपनीने गुंतवणुकीपूर्वी सुरू केला आहे सर्व्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 23:03 IST

औरंगाबाद : महाराष्ट्र शासनाच्या २०१९ ते २०२४ पर्यंतच्या औद्योगिक धोरणाच्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय पातळीवरील चीन येथील वॅनफेंग आॅटो होल्डिंग गु्रप ...

ठळक मुद्देउद्योग : गुंतवणुकीपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून जाणून घेतली शहराची माहिती

औरंगाबाद : महाराष्ट्र शासनाच्या २०१९ ते २०२४ पर्यंतच्या औद्योगिक धोरणाच्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय पातळीवरील चीन येथील वॅनफेंग आॅटो होल्डिंग गु्रप हा उद्योग औरंगाबादेतील आॅरिक सिटीमध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. गुंतवणुकीच्या अनुषंगाने कंपनीच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची गुरुवारी भेट घेऊन गुंतवणुकीपूर्वी शहरातील समस्या जाणून घेतल्याचे वृत्त आहे.आॅरिक सिटीचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी नामदेव जाधव यांच्यासोबत कंपनीच्या चार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज जिल्हाधिकाºयांची भेट घेतली. कंपनीने गुंतवणुकीपूर्वी एक सर्व्हे सुरू केला आहे. त्या सर्व्हेमध्ये शहरातील भौगोलिक व इतर सामाजिक माहिती संकलित केली जात आहे. शहराच्या समस्या म्हणून नव्हे तर कंपनीने थोडक्यात शहराच्या माहिती संकलनासाठी पाहणी सुरू केली आहे, असे सूत्रांनी सांगितले.किया मोटार्स या अँकर प्रोजेक्टसह एलजी कंपनी आॅरिकमध्ये येता-येता राहिली. येथील औद्योगिक वसाहतींत आॅटोमोबाईल्स आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील उत्पादन करणाºया कंपन्या आहेत. त्यामुळे एलजी किंवा किया मोटार्ससारखे उद्योग येथे आले असते, तर व्हेंडर डेव्हलपमेंटसाठी मोठी चालना मिळाली असती. ह्योसंग या वस्त्रोद्योगातील कंपनीचे बांधकाम सध्या आॅरिकमध्ये सुरू आहे. वॅनफेंग आॅटो होल्डिंग हा गु्रप आॅरिकमध्ये आल्यास मोठ्या प्रमाणात व्हेंडर डेव्हलपमेंटला चालना मिळणे शक्य होईल.काय उत्पादन आहे वॅनफेंगचेचीन येथील वॅनफेंग आॅटो होल्डिंग गु्रपने औरंगाबाद, रायगड आणि तळेगाव येथील औद्योगिक वसाहतीतील जागांचा विचार केला आहे. अ‍ॅल्युमिनिअम अलॉय व्हील्सचे उत्पादन करणारी ही कंपनी सुमारे ४ हजार ५०० कोटी रुपये गुंतवणूक करून उद्योग उभारण्याचा विचार करीत आहे. सदरील कंपनीला १०० ते २०० एकर जागेची गरज आहे. शेंद्रा एमआयडीसी लगत असलेल्या आॅरिक सिटीमध्ये मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहे. कंपनीचे उत्पादन युरोप व इतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जाते. मशीन टूल्स, इलेक्ट्रिक बससाठी लागणाºया उपकरणांचे उत्पादन ही कंपनी करते. शिवाय आॅटोमोबाईल्स क्षेत्रातील उत्पादनेही ही कंपनी करते. कंपनीचे शिष्टमंडळ चार दिवस शहरातशिष्टमंडळाने औरंगाबादेतील डीएमआयसीच्या शेंद्रा नोडची चाचपणी सुरू केली आहे. जिल्हाधिकाºयांशी शिष्टमंडळाने औरंगाबादच्या औद्योगिक विश्वाबाबत आणि शहराबाबत माहिती जाणून घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. चार दिवस शिष्टमंडळ शहरात असणार आहे. सहा महिन्यांपासून कंपनी औरंगाबादचा अभ्यास करीत आहे. या कंपनीने येथील वातावरण आणि अडचणींचा अभ्यास सुरू केला आहे. गुरुवारी शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांशी औरंगाबादेतील वातावरणाची माहिती जाणून घेतली. चीनच्या झिनचँग काऊंटीमध्ये मुख्यालय असलेली ही कंपनी प्रामुख्याने आॅटो, एरोस्पेस, लष्करी सामग्री आदी गोष्टींची निर्मिती करण्यात अग्रेसर आहे. बारा हजार जणांना रोजगार देणारी ही कंपनी चीनच्या अव्व्ल ३० उद्योगांपैकी एक आहे. सुमारे १०० ते २०० एकरवर उद्योग उभारण्याचा मानस असलेली ही कंपनी औरंगाबादेत ४ हजार जणांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMIDCएमआयडीसी