शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

चीनच्या खरेदीने तांदूळ महागला; विवाद असला तरी भारतातून मोठ्याप्रमाणावर खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 18:52 IST

महाराष्ट्रसह आंध्र प्रदेश, तेलगणा, पंजाब, हरयाणा आदी राज्यांतून नवीन तांदळाची आवक सुरू झाली आहे.

ठळक मुद्देस्थानिक बाजारपेठेत मागील आठवड्यात तब्बल १०० टन नवीन तांदूळ विक्रीसाठी आला. मागील वर्षाच्या तुलनेत क्विंटलमागे  ५०० ते ७०० रुपयांनी जास्त भावात वाढ

औरंगाबाद : सीमेवर विवाद असला तरी चीनने भारतातील तांदूळ खरेदीसाठी करार केला आहे. याचा फायदा घेत देशातील बड्या साठेबाजांनी तांदळाचे भाव क्किंटलमागे  ५०० ते ७०० रुपयांनी वाढवून विक्री सुरू केली आहे. 

महाराष्ट्रसह आंध्र प्रदेश, तेलगणा, पंजाब, हरयाणा आदी राज्यांतून नवीन तांदळाची आवक सुरू झाली आहे. स्थानिक बाजारपेठेत मागील आठवड्यात तब्बल १०० टन नवीन तांदूळ विक्रीसाठी आला. जेव्हा नवीन तांदळाची आवक सुरू होते, तेव्हा तांदळाचे भाव कमी होतात. मात्र, यंदा उलटे झाले. नवीन तांदूळ येताच भाव वधारले. मागील वर्षाच्या तुलनेत क्विंटलमागे  ५०० ते ७०० रुपयांनी जास्त भावात म्हणजे २९०० ते ८८०० रुपये प्रतिक्विंटल तांदूळ विक्री होत आहे. होलसेल व्यापाऱ्यांनी सांगितले की, तब्बल ३० वर्षांनंतर यंदा चीनने पुन्हा एकदा भारताकडून तांदूळ आयातीचा करार केला आहे. यात पहिली ऑर्डर १ लाख टनाची दिली आहे.

सध्या केंद्र सरकार शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे यासाठी मार्ग काढण्यात व्यस्त आहे. याचा फायदा उचलत देशातील बड्या साठेबाजांनी तांदळाचे दर वाढवून विक्रीला सुरुवात केली आहे, तसेच महाराष्ट्र व छत्तीसगड येथील धानाला काही प्रमाणात कीड लागल्याचे सांगितले जात आहे. मागील आठवड्यातच जाधववाडी बाजार समितीच्या अडत बाजारात नवीन तुरीची आवक सुरू झाली आहे. ५५०० ते ६००० रुपये प्रतिप्रतिक्विंटल भाव मिळत आहे. भाजीमंडईत पालेभाज्यांची विशेषतः मेथीची भाजी  मातीमोल भावात विकली जात आहे. भाज्या स्वस्त झाल्याने ग्राहकही पालेभाज्या खरेदी करीत आहेत. 

चीनमुळे तांदूळ वधारला...  धान्य         १३ डिसेंबर          २० डिसेंबर (प्र.कि.) तांदूळ         २५ ते ९०  रु.     ३० ते ९८ रु. गहू            २२ ते २६ रु.     २२ ते २६ रु. ज्वारी      ३० ते ३५ रु.       ३० ते ३५ र.बाजरी     १९ ते २० रु.       १९ ते २० रु. 

पालेभाज्यांचे भावभाजी     १३ डिसेंबर          २० डिसेंबर मेथी       २ रुपये (जुडी)       २ रुपयेकांदा        ३० रुपये (किलो)    २० रुपयेबटाटा        ४० रुपये (किलो)     ३० रुपयेभेंडी          ३० रुपये              २५ रुपये

अचानक भाववाढमागील आठवड्यात अचानक भाव वाढले. चीनकडून खरेदी व धानाला काही प्रमाणात कीड लागणे हे भाव वधारण्यास कारणीभूत आहे. - नीलेश सोमाणी, होलसेल व्यापारी

मेथी मातीमोलग्राहकांना २ रुपयांत एक जुडी मेथी विकत मिळत आहे.  शेतकऱ्याच्या हाती जुडीमागे १ रुपयाच मिळतो.- अनंत जोगदंड, शेतकरी

भाज्या स्वस्तस्वस्त  भाज्याच सध्या खरेदी करत आहोत. जानेवारीत नवीन तांदूळ खरेदी करू. स्वाती पुराणिक, गृहिणी 

टॅग्स :FarmerशेतकरीAurangabadऔरंगाबादchinaचीनAgriculture Sectorशेती क्षेत्र