‘बिग बी’ समवेत चिमुकल्यांनी केली धमाल

By Admin | Updated: July 31, 2014 00:48 IST2014-07-30T23:53:01+5:302014-07-31T00:48:40+5:30

नांदेड: प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा बिग बी प्रत्यक्षात शाळेत अवतरल्याचे पाहून चिमुकल्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही़

Chimukalea with 'Big B' has done a lot of fun | ‘बिग बी’ समवेत चिमुकल्यांनी केली धमाल

‘बिग बी’ समवेत चिमुकल्यांनी केली धमाल

नांदेड: प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा बिग बी प्रत्यक्षात शाळेत अवतरल्याचे पाहून चिमुकल्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही़ हुबेहूब दिसणाऱ्या ज्युनिअर अमिताभला मुलांच्या भेटीचा प्रसंग लोकमत बालविकास मंचने सोमवारी शहरात घडवून आणला़
रुपेरी पडद्याच्या माध्यमातून अँग्री ओल्ड मॅन अमिताभ बच्चनची जादू गत पाच दशकांहून अधिक काळापासून प्रत्येकाच्या मनावर कायम आहे़ अभिनेता, कवी या प्रतिमांपेक्षाही टीव्हीवरील केबीसी गेम शो मधील अमिताभ सर्वांना भावला़ याच कार्यक्रमातील प्रसिद्ध ओळ कॉम्युटरजी लॉक किया जाए म्हणत़़ ज्युनिअर अमिताभ बच्चनने नांदेड शहरातील काही निवडक शाळांना भेट दिली़ अँग्री ओल्ड मॅनची एन्ट्री झाल्यावर अगदी लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांची अमिताभला ओळखण्यात गल्लत झाली़ अगदी हुबेहूब देहबोली, चेहऱ्याची ठेवण, आवाजातील चढउतार, डायलॉग डिलीव्हरी यातील साम्य अनुभवण्याजोगे होते़
शहरातील केंब्रीज हायस्कूल, गुजरातील हायस्कूल, शिवाजी हायस्कूल, माधवराव पाटील शाळा, महात्मा फुले हायस्कूल आदी शाळांना ज्युनिअर अमिताभने भेट दिली़ बाबानगर येथील महात्मा फुले हायस्कूलमध्ये आगमन झाल्यावर खास शैलीत कौन बनेगा करोडपती ही मालिका लाईव्ह सादर करत एका विद्यार्थिनिला हॉटसिटवर बसवले़ विविध प्रश्नांची रंगीत तालिम विद्यार्थ्यांकडून त्यांनी करवून घेतली़ विविध नकला सादर करत खळखळून हसण्यास सर्वांना भाग पाडले़ तसेच पार्टी तो बनती है या गाण्यावर ताल धरत विद्यार्थ्यांनी त्यांना साथ दिली़ चिमुकल्यांच्या फर्माइश पूर्ण करत खुश तो बहोत होंगे आप, डॉन का इंतजार तो बारा मुल्को की पुलीस कर रही है़़़आदी डायलॉग सादर केले़
लहान मुलांच्या आवडत्या भूतनाथने आपल्या जादूने मुलांना चांगलीच भुरळ घातली़ लोकमत बालविकास मंचच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येतात़ शैक्षणिक माहिती, कलागुणांना चालना देण्याचे काम या माध्यमातून होते़ तेव्हा बालविकास मंचचे सदस्य व्हा, असे आवाहन ज्युनिअर अमिताभने आपल्या खास शैलीत केले़ लवकरच ही नोंदणी सुरु होणार असून याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Chimukalea with 'Big B' has done a lot of fun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.