शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

जन्मदात्यांच्या वादात बालकावर उपचार रखडले; हायकोर्टच्या तत्परतेमुळे शस्त्रक्रियेचा मार्ग मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 17:44 IST

केजच्या न्यायालयाने बालकाच्या गंभीर प्रकरणाबाबत दाखविलेल्या उदासीनतेची गंभीर दखल घेत संबंधित न्यायाधीशांचे वर्तन ‘अशोभनीय’ असल्याचा उल्लेख करीत खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली.

छत्रपती संभाजीनगर : जन्मदात्यांच्या कौटुंबिक कलहात अवघ्या दीड वर्षाच्या बाळाची हृदय शस्त्रक्रिया अडकल्यामुळे त्याच्या जिवास असलेल्या धोक्याची गंभीर दखल घेत, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे सुट्टीतील न्यायमूर्ती रोहित डब्ल्यू. जोशी यांनी बालकाला शस्त्रक्रियेसाठी त्याच्या वडिलांकडे सोपविण्याचा आदेश मंगळवारी (दि. २७) दिला होता. त्यानुसार आईने बुधवारी (दि. २८) दुपारी ३ वाजता उभयपक्षाच्या वकिलांच्या उस्थितीत खंडपीठात बालकास त्याच्या वडिलांकडे सोपविले. त्यामुळे निर्धारीत तारखेस त्याच्यावर हृदय शस्त्रक्रिया होऊन त्याला जीवदान मिळण्याचा मार्ग सुकर झाला.

नेमके काय आहे प्रकरण ?बालकाच्या आई-वडिलांचा विवाह २०२१ ला झाला. त्यांना दीड वर्षाचा मुलगा आहे, परंतु दुर्दैवाने त्याला हृदयाचा गंभीर आजार असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यावर तत्काळ हृदय शस्त्रक्रियेचा सल्ला डॉक्टरांनी दिला. जूनच्या पहिल्या आठवड्यात बालकाच्या शस्त्रक्रियेची तारीखही निश्चित करण्यात आली होती. पती-पत्नीमधील मतभेदामुळे ५ एप्रिल २०२५ रोजी पत्नी दीड वर्षाच्या बालकास गंभीर अवस्थेत सोबत घेऊन माहेरी केज येथे निघून गेली, तेव्हापासून बाळाची देखभाल होत नसल्यामुळे, तसेच त्याला वैद्यकीय उपचार मिळत नसल्यामुळे पतीने मुलाचा तात्पुरता ताबा मिळण्यासाठी केजच्या जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, ‘मुलगा आईच्या ताब्यात असल्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलाच्या ताब्याबाबत तत्काळ निकाल देता येणार नाही’, असा आदेश न्यायालयाने दिला.

उच्च न्यायालयाचा आदेशजिल्हा न्यायालयाच्या आदेशाला पतीने ॲड. महेंद्र गंडले यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले. खंडपीठाने जिल्हा न्यायालयाचा आदेश रद्द करून वरीलप्रमाणे आदेश दिला. उपचारादरम्यान मुलगा वडिलांच्या ताब्यात राहील. आई २०० किमी दूर केजला राहत असल्यामुळे वैद्यकीय सल्ल्यानुसार तिला मुलाचा ताबा दिला जाईल. पतीच्या ताब्यात मुलगा असताना त्याने पत्नीला त्याला भेटू द्यावे. मुलाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर पतीने तशा आशयाचे शपथपत्र आणि आवश्यक त्या कागदपत्रासह खंडपीठात माहिती सादर करावी, असेही आदेशात म्हटले आहे.

उच्च न्यायालयाची तीव्र नाराजीकेजच्या न्यायालयाने बालकाच्या गंभीर प्रकरणाबाबत दाखविलेल्या उदासीनतेची गंभीर दखल घेत संबंधित न्यायाधीशांचे वर्तन ‘अशोभनीय’ असल्याचा उल्लेख करीत खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच, वडिलांना तात्पुरता ताबा देण्यास विरोध करणाऱ्या आईचे वर्तनही ‘धक्कादायक’ असल्याचे आदेशात म्हटले आहे.

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठCrime Newsगुन्हेगारीHealthआरोग्य