नदीत उडी घेऊन वृद्धाची आत्महत्या

By Admin | Updated: July 9, 2017 00:34 IST2017-07-09T00:32:41+5:302017-07-09T00:34:38+5:30

परतूर : नव्वद वर्षीय इसमाने दुधना नदीच्या पुलावरून पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली.

Child's suicide by jumping into the river | नदीत उडी घेऊन वृद्धाची आत्महत्या

नदीत उडी घेऊन वृद्धाची आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : नव्वद वर्षीय इसमाने दुधना नदीच्या पुलावरून पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली.
मृत वृद्धाचे नाव रामराव गोविंदराव जोशी (९० , रा. देवगाव खवणे, ह. मु. मंठा ) असे आहे. मृृत जोशी आत्महत्या करण्यासाठी बसने आले व रोहिणा गावच्या थांब्यावर उतरले. दीडच्या सुमारास रोहिणाजवळील दुुधना नदीवरील नवीन पुलावरून त्यांनी पाण्यात उडी घेतली. पुलाखाली निम्न दुधना प्रकल्पाचे बॅक वॉटर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झाला. नैराश्यातून वृद्धाने हे पाऊल उचलले असावे, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. जमादार एम. पी. सुरडकर तपास करत आहेत.

Web Title: Child's suicide by jumping into the river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.