ट्रकखाली चिरडून बालकाचा मृत्यू
By Admin | Updated: September 12, 2014 00:08 IST2014-09-11T23:39:55+5:302014-09-12T00:08:17+5:30
दैठणा : परभणी- गंगाखेड रस्त्यावर ट्रकखाली चिरडून चार वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना ११ सप्टेंबर रोजी दुपारी घडली़

ट्रकखाली चिरडून बालकाचा मृत्यू
दैठणा : परभणी- गंगाखेड रस्त्यावर ट्रकखाली चिरडून चार वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना ११ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली़
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार परभणी - गंगाखेड रस्त्यावर दैठणा या गावाजवळ ही घटना घडली़ भामाबाई बाजीराव गायकवाड या आपल्या नातवाला घेऊन शेताकडे जात होत्या़ परभणीकडून गंगाखेडकडे जाणारा ट्रक (एमएच १२ एफझेड ६८९३) हा दैठण्याजवळ आला असता रस्त्यावरून जाणाऱ्या समाधान दत्तात्रय गायकवाड यास जोराची धडक बसली़ उपचारासाठी त्याला दैठणा येथील वैद्यकीय आरोग्य केंद्रात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी रेवती महाजन यांनी त्याला मृत घोषित केले़ घटनेची माहिती मिळताच माजी सरपंच राजाराम कच्छवे, अभय कच्छवे, फौजदार महेश ठाकूर, नागनाथ मुंडे, राजू कुलकर्णी, सखाराम खळीकर यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली़ ट्रक चालक रहीम नूरदात खान यास पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला़ तपास पोलिस निरीक्षक किशोर तरोने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत़ (वार्ताहर)