खेळताना गरम पाण्याच्या पातेल्या पडल्याने बालकाचा मृत्यू
By Admin | Updated: April 27, 2017 21:38 IST2017-04-27T21:36:18+5:302017-04-27T21:38:28+5:30
खेळताना गरम पाण्याच्या पातेल्यात पडल्याने गंभीर भाजलेल्या तीन वर्षीय चिमुकल्याचा उपचारादरम्यान

खेळताना गरम पाण्याच्या पातेल्या पडल्याने बालकाचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 27 - खेळताना गरम पाण्याच्या पातेल्यात पडल्याने गंभीर भाजलेल्या तीन वर्षीय चिमुकल्याचा उपचारादरम्यान बुधवारी रात्री मृत्यू झाला. ही घटना छावणी परिसरातील ख्रिस्तनगरात १६ एप्रिल रोजी घडली होती.
जॉय जोएल उमाप (३) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. १६ एप्रिल रोजी इस्टर संडेनिमित्त घरी धार्मिक कार्यक्रम सुरू होता. यावेळी पाहुण्यांसाठी मोठ्या पातेल्यात बिर्याणी तयार केली जात होती. पातेल्यातील गरम पाण्यातून तांदूळ बाहेर काढून बाजूला ठेवण्यात आला होता. तेथे खेळत असलेल्या जॉयचा पाय घसरला आणि तो पातेल्यात पडला. नातेवाईकांनी त्यास पाण्यातून बाहेर काढून घाटी रुग्णालयात दाखल केले. ट्रॉमा केअरमध्ये उपचार सुरू असताना २६ रोजी रात्री जॉयची प्राणज्योत मालवली. छावणी ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.