शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मुलांनो, मामाच्या गावाला जा; पण मे महिन्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2022 18:45 IST

शाळांच्या उन्हाळ्याच्या सुट्या कमी अथवा रद्दही नाहीत

औरंगाबाद : अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शाळांना एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आवठड्यापर्यंत पूर्णवेळ वर्ग सुरू ठेवावे लागतील. एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात वार्षिक परीक्षा घेऊन १ मे रोजी निकाल जाहीर करणे अपेक्षित आहे. त्यानंतर नेहमीप्रमाणे शाळांना उन्हाळी सुट्या राहतील. सुट्या कमी अथवा रद्द करण्यात आलेल्या नाहीत, असे शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

शिक्षण उपसंचालक साबळे यांनी सांगितले की, कोविडमुळे मागील दोन वर्षांत मोजक्याच दिवस शाळा सुरू राहिल्या. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणावर भर देण्यात आला. मात्र, नेटवर्कच्या मर्यादेमुळे मुलांपर्यंत पाहिजे तेवढे हे शिक्षण पोहोचले नाही. परिणामी, अनेक शाळांना अभ्यासक्रम पूर्ण करता आला नाही. ऑक्टोबरपासून कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे शाळा सुरू करण्यात आल्या. काही शाळांनी अभ्यासक्रम पूर्ण केला, तर काही शाळांचा अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे शिक्षण विभागाने एप्रिल महिन्यात खाजगी, तसेच जिल्हा परिषदेच्या शाळा पूर्णवेळ सुरू ठेवून अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे परिपत्रक जारी केले. मात्र, काही पालक, शिक्षकांनी या आदेशाचा चुकीचा अर्थ लावला आहे. उन्हाळी सुट्या मे महिन्यापासून सुरू होतील व जूनच्या दुसऱ्या आठवड्यात नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे.

मग, रिव्हिजन कराज्या शाळांनी अभ्यासक्रम पूर्ण केला असेल, अशा शाळांनी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत मुलांची रिव्हिजन घ्यावी व तिसऱ्या आठवड्यात द्वितीय सत्राची परीक्षा घ्यावी. ज्या शाळांचा अभ्यासक्रम राहिला असेल, त्या शाळा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी रविवारीदेखील वर्ग भरवू शकतात. मात्र, हा निर्णय शाळांसाठी बंधनकारक नसून तो ऐच्छिक आहे.

सुटीचा बेत रद्द करण्याची गरज नाहीमुलांच्या शाळांना उन्हाळी सुट्या लागल्या की, अनेकांना मामाच्या गावाला जाण्याचे वेध लागतात. काही पालक सुट्यांत फिरण्याचा बेत आखतात. मागील दोन वर्षांत कोरोना प्रादुर्भावामुळे बाहेरगावी जाता आले नाही. आता कोरोनाचा प्रादुर्भावही कमी झाला आहे. शासनाने अनेक निर्बंधही हटविले आहेत. त्यामुळे यंदा उन्हाळी सुट्यांत फिरण्याचा बेत आखला होता; परंतु उन्हाळी सुट्या रद्द झाल्याचा गैरसमज करत शिक्षण विभागाच्या निर्णयाला अनेकांनी विरोध दर्शविला होता. मात्र, सुट्या रद्द होणार नाहीत.

टॅग्स :SchoolशाळाAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदStudentविद्यार्थीEducationशिक्षण