शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

रंगोत्सवात उडविली बालकांनी धमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 00:40 IST

रंगीबेरंगी फेटे बांधलेल्या मुुला-मुलींनी एकामेकांना विविध रंगांत भिजवून धमाल-मस्ती केली. सवंगड्यांसोबत आयुष्यातील एक अविस्मरणीय रंगोत्सव साजरा केल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहºयावर दिसत होता. लोकमतचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा या रंगोत्सवात सहभागी झाल्याने बालकांचा आनंद आणखी द्विगुणित झाला होता.

ठळक मुद्देलोकमत आधार युवा मंच : अविस्मरणीय ठरली मुला व मुलींना होळी, विविधरंगी फेटे बांधल्यामुळे मुलांचा आनंद गगनात मावेना

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : रंगीबेरंगी फेटे बांधलेल्या मुुला-मुलींनी एकामेकांना विविध रंगांत भिजवून धमाल-मस्ती केली. सवंगड्यांसोबत आयुष्यातील एक अविस्मरणीय रंगोत्सव साजरा केल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहºयावर दिसत होता. लोकमतचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा या रंगोत्सवात सहभागी झाल्याने बालकांचा आनंद आणखी द्विगुणित झाला होता.प्रसंग होता. लोकमत आधार युवा मंच औरंगाबाद आयोजित ‘रंगोत्सव-२०१८’चा. एन-४ येथील पारिजातनगर मैदानात गुरुवारी होळीच्या निमित्ताने सोमनाथ बोंबले यांनी रंगोत्सवाचे आयोजन केले होते. मैदानात विविध शाळांतील मुले-मुली सहभागी झाले होते. मंडपात बसलेल्या प्रत्येक मुलाला आवर्जून फेटा बांधण्यात येत होता. फेटे बांधल्याने मुलांचा आनंद गगनात मावत नव्हता. लोकमतचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा मैदानात आले व सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट करीत त्यांचे स्वागत केले. राजेंद्र दर्डाही नंतर या मुलांमध्ये मिसळून गेले. मुलांना फुगे देत त्यांच्याशी संवाद साधला. यामुळे आनंदित झालेल्या मुलींनी तर ‘आयुष्याचे द्यावे उत्तर’ असे उत्स्फूर्तपणे सामूहिक गीत सादर करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. काही चिमुकल्यांनी सर्वप्रथम राजेंद्र दर्डा यांना रंग लावला आणि रंगोत्सवाला सुरुवात झाली. सर्व मुला-मुलींनी एकामेकांना कोरडा रंग लावत धमाल केली. अनेकांनी रंग हवेत उधाळला. आपापल्या मित्रांना-मैत्रिणींना रंगात पूर्ण नाहून टाकले. सजविलेल्या घोडागाडीतही मुलांनी सैर करून आनंद लुटला. रंगीत बर्फगोळा खाण्यासाठी तर अक्षरश: मुलांच्या उड्या पडल्या होत्या. रंगोत्सव खेळणे झाल्यावर सर्व मुला-मुलींनी जेवणाचा आस्वाद घेतला. ‘आजचा दिवस आम्ही कधी विसरू शकणार नाही,’ अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया मुलांनी व्यक्त केल्या. यात शोभना शिक्षण संस्था संचलित निराधार-निराश्रित बालगृह, स्वामी समर्थ बालगृह, वसंतराव नाईक बालगृह, गजानन बालगृह यांच्यासह पारिजातनगरमधील मुले-मुली सहभागी झाले होते.या रंगोत्सवात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, खुशालचंद बाहेती, आर.आर.आबा फाऊंडेशनचे विनोद पाटील, माजी नगरसेवक अभिजित देशमुख, अग्रवाल सभाचे अध्यक्ष डॉ. सुशील भारुका, मनोज भंडारी, गुरविंदर फुटेजा, किरण शेट्टी, सचिन देशमुख यांनीही एकामेकांना रंग लावून धमाल उडवून दिली. रंगोत्सव यशस्वीतेसाठी मंदार जोशी, सदाशिव बोंबले, विजय वाहूळ, प्रीतेश कोठावाला, बाळू औताडे, प्रकाश तिलघर, स्मिता बोंबले, मनीषा बोंबले, सुरेश भोसले, कीर्ती उढाण, डॉ. तेजस्विनी सराफ, दीपाली सरपटे यांनी परिश्रम घेतले.अनिष्ट प्रथा, वाईट प्रवृत्तींचा होळीत नाश करा -राजेंद्र दर्डाहोळी का साजरी करतात, याची माहिती देत राजेंद्र दर्डा यांनी अनिष्ट प्रथा, वाईट प्रवृत्तींचा या होळीत नाश करा, असे आवाहन मुला-मुलींना केले. यानंतर मुलींनी आरती करीत होळी पेटविली. वाईट प्रवृत्तींच्या विरोधात यावेळी बोंबा मारण्यात आल्या.