शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

उद्योजक लड्डा यांचा बालमित्रानेच केला घात; दरोडा प्रकरणाची उकल, आणखी चार अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 15:23 IST

आतापर्यंत दहा आरोपी अटकेत, मात्र साडेपाच किलो सोने आणि ३० किलो चांदीचा शोध लागला नाही

छत्रपती संभाजीनगर: शहरातील सर्वात मोठ्या दरोड्याच्या कटाची संपूर्ण उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आणखी चार जणांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे, लड्डा यांच्या घरातील रोकड, दागिन्यांची माहिती देणारा त्यांचा बालमित्रच निघाला आहे. आतापर्यंत या प्रकरणात दहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, दरोड्यातील साडेपाच किलो सोने आणि ३० किलो चांदीचा अद्याप तपास लागला नाही.

१५ मे रोजी वाळूज येथील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर धाडसी दरोडा पडला होता. यात तब्बल साडेपाच किलो सोने, ३० किलो चांदी आणि रोकड चोरीस गेली. शहरातील सर्वात मोठा दरोडा ठरल्याने पोलिसांनी काटेकोर तपास केला. पाच दरोडेखोर ताब्यात घेतल्यानंतर अमोल खोतकर या दरोडेखोराचे पोलिसांनी एन्काउंटर केले. त्यानंतर पोलिस तपासात दरोड्याविषयी रोज नवे धक्कादायक खुलासे होत आहेत. उद्योजक लड्डा यांच्या घरातील संपत्तीविषयी वडगाव कोल्हाटीच्या शिवाजीनगरमध्ये राहणाऱ्या स्कूलबस चालक देवीदास नाना शिंदे (४५) याने माहिती देऊन दरोडा टाकण्यास सांगितल्याचे शुक्रवारी उघड झाले. शिंदे त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता पोलिसांना आणखी तिघांची माहिती मिळाली. यावरून आज बाळसाहेब चंद्रकांत इंगोले, आदिनाथ जाधव, गणेश गोराडे, महेश गोराडे या चार जणांना ताब्यात घेत संपूर्ण दरोडा प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.

शिंदे पर्यन्त माहिती कशी आली? देवीदास शिंदे वाळूजमधीलच एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या बसवर चालक आहे. त्याला महेश गोराडे याने लड्डा यांच्या संपत्तीबद्दल माहिती दिल्याचे उघड झाले. अधिक तपास केला असता महेशला गणेश गोराडे याने माहिती दिली होती. तर गणेशला याची माहिती आदिनाथ जाधव याने दिल्याचे उघड झाले. तर जाधव याला लड्डा यांचा मित्र बाळासाहेब इंगोले याने माहिती दिल्याचे अधिक तपासातून स्पष्ट झाल्याने लड्डा दरोडा प्रकरणाचा पूर्ण उलगडा झाला.

बालमित्रच निघाला घरभेदीमात्र लड्डा यांच्या घरातील नेमकी माहिती दरोडेखोरांना होती असे लक्षात आल्याने यात जवळचा कोणीतरी गुंतल्याच्या दृष्टीने पोलिसांनी तपास करत होते. यातून लड्डा यांचा बालमित्र बाळासाहेब इंगोलेचे नाव पुढे आले. इंगोले याला लड्डा यांनी स्वतःच्या कंपनीत कटींग इन चार्ज म्हणून नोकरी दिली होती. बालमित्र असल्याने इंगोलेचा लड्डा यांच्या घरात सहज वावर होता. मात्र, मागील काही दिवसांपूर्वी लड्डा आणि इंगोले यांच्या कामाच्या ठिकाणी वर्तवणुकीवरून वाद झाला. यातून इंगोले याने लड्डा यांना धडा शिकवायचे ठरवले. मित्र लड्डा यांच्या सर्व संपत्तीची माहिती इंगोले याला होती. यातूनच इंगोले याने आदिनाथ जाधव याला याची माहिती दिली. यानंतर गणेश गोराडे, महेश गोराडे, देविदास शिंदे अशी माहिती पुढे जात हाजबे आणि खोतकर यांचेपर्यंत पोहचली. यानंतरच शहरातील सर्वात मोठ्या दारोदयचे नियोजन हाजबेच्या हॉटेलवर ठरले.

हे आरोपी अटकेतदरोड्यातील प्रमुख सूत्रधार अमोल बाबूराव खोतकर (३४, रा. पडेगाव) याचे गुन्हे शाखेने ‘एन्काउंटर’ केले, तर त्याचे साथीदार याेगेश सुभाष हाजबे (३१, रा. वडगाव कोल्हाटी), सय्यद अजहरोद्दीन सय्यद कबिरोद्दीन (३७, रा. रांजणगाव शेणपुंजी), महेंद्र माधव बिडवे (३८, रा. साजापूर), सुरेश ऊर्फ सूर्यकांत रामकिसन गंगणे (४५, रा. अंबाजोगाई), सोहेल जलील शेख (२२, रा. अंबाजोगाई) ही सध्या पोलिस कोठडीत आहेत. त्यानंतर शुक्रवारी देविदास शिंदे तर आज बाळासाहेब इंगोले, आदिनाथ जाधव, गणेश गोराडे, महेश गोराडे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरRobberyचोरीCrime Newsगुन्हेगारी