दाम्पत्यासह बालके जखमी
By Admin | Updated: August 22, 2016 01:16 IST2016-08-22T01:00:40+5:302016-08-22T01:16:00+5:30
परंडा : बहिणीकडे रक्षाबंधनाची राखी बांधून पत्नी व मुलांसह गावाकडे परतणाऱ्या एका इसमाची दुचाकी खड्ड्यात आदळून रस्त्याच्या कडेला पडली़

दाम्पत्यासह बालके जखमी
परंडा : बहिणीकडे रक्षाबंधनाची राखी बांधून पत्नी व मुलांसह गावाकडे परतणाऱ्या एका इसमाची दुचाकी खड्ड्यात आदळून रस्त्याच्या कडेला पडली़ या अपघातात पती-पत्नीसह त्यांची बालके जखमी झाली़ हा अपघात रविवारी सायंकाळी परंडा शहरानजीक करमाळा राज्य मार्गावर घडला़
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, करमाळा तालुक्यातील वरकुटे येथील सचिन धर्मराज बिडकुते (वय-३०) हे रविवारी सकाळी भोत्रा ( ता. परंडा) येथे त्यांच्या बहणीकडे रक्षाबंधनासाठी आले होते. रक्षाबंधनाचा कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास पत्नी रुपाली बिडकुते (वय-२५) व लहान दोन मुलांना घेऊन परंडा मार्गे वडकुटे गावाकडे जात होते़ त्यांची दुचाकी परंडा शहरानजीक ईदगाह मैदानाजवळील करमाळा राज्य मार्गावर आली असता महामार्गावरील मोठया खड्डयात अचानक आदळली़ खड्ड्यात दुचाकी आदळल्याने चालक सचिन बिडकुते यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून दुचाकी रस्त्याच्या कडेला पडली़ या अपघातात सचिन बिडकुते यांच्या हाताला व पायाला जखम झाली तर त्यांची पत्नी रुपाली यांच्या डोक्याला व पाठीला जबर मार लागला आहे़ अपघातात त्यांचे दोन्ही लहान मुले किरकाळ जखमी झाली़ जखमींवर परंडा येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत़ गंभीर जखमी रूपाली या बेशुध्द अवस्थेत आहेत़