पालिकेची फसवणूक
By Admin | Updated: August 2, 2014 01:39 IST2014-08-02T00:52:19+5:302014-08-02T01:39:25+5:30
तुळजापूर : बनावट कागदपत्राद्वारे नगर पालिकेच्या जागेत बांधकाम व्यावसायिकास बीओटी तत्त्वावर बांधकामाचा परवाना दिल्याप्रकरणी तुळजापूर नगर पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी,

पालिकेची फसवणूक
तुळजापूर : बनावट कागदपत्राद्वारे नगर पालिकेच्या जागेत बांधकाम व्यावसायिकास बीओटी तत्त्वावर बांधकामाचा परवाना दिल्याप्रकरणी तुळजापूर नगर पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी, तत्कालीन नगर अभियंत्यासह चौघाविरूध्द न्यायालयाच्या आदेशावरून शुक्रवारी तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पोलिसांनी सांगितले की, तुळजापूर नगर पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी संतोष रामचंद्र टेंगळे, तत्कालीन नगर अभियंता लिलाधर तळेकर, दिलीप अण्णासाहेब पाटील, दिनेश पाटील यांनी नगर पालिकेच्या आरक्षण क्रमांक २१ मधील सर्वे क्ऱ २ वरील जागेचे खोटे कागदपत्र सादर करीत जागा बांधकाम व्यावसायिकास बीओटी तत्त्वावर देवून पालिकेची फसवणूक केल्याची तक्रार नगरसेवक नागनाथ भांजी यांनी न्यायालयात दिली होती़ या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून वरील चौघाविरूध्द तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सदर घटनेचा अधिक तपास पोनि ज्ञानोबा मुंडे हे करीत आहेत़ (वार्ताहर)