कुक्कडगावामध्ये मुलाचा बुडून मृत्यू
By Admin | Updated: September 25, 2014 00:55 IST2014-09-25T00:19:55+5:302014-09-25T00:55:16+5:30
कुक्कडगाव : बीड तालुक्यातील कुक्कडगाव येथे बुधवारी दुपारी दोन वाजता १२ वर्षीय मुलाचा नदीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला़ या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे़

कुक्कडगावामध्ये मुलाचा बुडून मृत्यू
कुक्कडगाव : बीड तालुक्यातील कुक्कडगाव येथे बुधवारी दुपारी दोन वाजता १२ वर्षीय मुलाचा नदीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला़ या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे़
रोहन चंद्रशेखर आठवले (वय १२) असे मयत मुलाचे नाव आहे़ आई सीमा यांच्यासोबत तो बुधवारी दुपारी धुणे धुण्यासाठी सिंदफणा नदीवर गेला होता़ वाहत्या प्रवाहात तो धुणे धुण्यासाठी उतरला़ मात्र तेथे डोह आहे हे त्याच्या लक्षात आले नाही़ डोहात बुडू लागल्यानंतर आई सीमाने आरडाओरड करण्यास सुरूवात केली़ मात्र तो बुडतच गेला़ नदीकाठावरील काही लोकांनी पाण्यात उड्या घेऊन त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला़ बीडमध्ये एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी आणले़ मात्र डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले़ (वार्ताहर)