शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

धारूरमध्ये उपचाराअभावी बालकाचा मृत्यू

By admin | Updated: August 12, 2015 01:00 IST

धारूर: येथील ग्रामीण रूग्णालयात एका १२ वर्षीय मुलास उपचार न मिळाल्यामुळे त्यास अंबाजोगाई येथे उपचारार्थ नेत असताना वाटेतच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली.

धारूर: येथील ग्रामीण रूग्णालयात एका १२ वर्षीय मुलास उपचार न मिळाल्यामुळे त्यास अंबाजोगाई येथे उपचारार्थ नेत असताना वाटेतच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. यामुळे ग्रामीण रूग्णालयाच्या कारभारावर रोष व्यक्त करण्यात येत आहे.शिवम महारूद्र पोटभरे असे त्या बालकाचे नाव आहे. तो शहरातील झोपडपट्टी भागातील रहिवाशी होता. मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास उलट्या होऊ लागल्या. त्यामुळे घराजवळच असलेल्या ग्रामीण रूग्णालयात कुटुंबियांनी त्याला दाखल केले. पुढील उपचारासाठी त्याला अंबाजोगाईला घेऊन जा, असे दवाखान्याकडून सांगण्यात आले. त्यामुळे नातेवाईकांनी त्याला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे नातेवाईक परत आले. त्यांनी या बालकाच्या मृत्यूसाठी डॉक्टर व कर्मचारी दोषी असल्याचा आरोप त्यांनी केला. रूग्णालयात मोठा जमाव जमा झाला होता.या बालकाच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी संतप्त कुटुंबियांनी केली. यामुळे येथील सर्व कामकाज ठप्प पडले होते. केज ग्रामीण रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. अशोक थोरात हे तेथे दाखल झाले. त्यांनी या लोकांचे म्हणणे ऐकून घेतले. वरिष्ठांना अहवाल पाठवून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर जमाव शांत झाला. (वार्ताहर)धारूर ग्रामीण रूग्णालयात एकच वैद्यकीय अधिकारी असून इतर पदे रिक्त आहेत. त्यामुळे येथील व्यवस्थापन ढासळलेले आहे. परिणामी, रूग्णांचे मोठे हाल होत आहेत. याही गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे.