लहान मुलाने शिट्टी वाजवल्याने मारहाण
By Admin | Updated: November 17, 2015 00:30 IST2015-11-16T23:59:14+5:302015-11-17T00:30:20+5:30
लातूर : लहान मुलाने शिट्टी वाजवल्याच्या कारणावरुन त्याच्या आईस संगणमत करत जबर मारहाण करुन शिवीगाळ केल्याची घटना गुफावाडी येथे रविवारी घडली़

लहान मुलाने शिट्टी वाजवल्याने मारहाण
लातूर : लहान मुलाने शिट्टी वाजवल्याच्या कारणावरुन त्याच्या आईस संगणमत करत जबर मारहाण करुन शिवीगाळ केल्याची घटना गुफावाडी येथे रविवारी घडली़ या प्रकरणी मुरुड पोलिस ठाण्यात चौघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे़
लातूर जिल्ह्यातील गुफावाडी येथील मीनाक्षी कुंदनसिंग तिवारी यांचा लहान मुलगा क्रांतीसिंग याने शिट्टी वाजवली़ या शिट्टी वाजवण्याच्या कारणावरुन आरोपी करणसिंग बलदेवसिंग तिवारी यांच्यासह अन्य तिघांनी मिनाक्षी यांना लाथा-बुक्क्याने जबर मारहाण केली़ यावेळी आरोपीने जळत्या लाकडाने मारहाण केल्यामुळे दंडावर, कोपराजवळ भाजले असून, आरोपीकडून अश्लिल शिवीगाळ केल्याचे मिनाक्षी तिवारी यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे़ या मारहाण प्रकरणी मुरुड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी करणसिंग बलदेवसिंग तिवारी यांच्यासह अन्य तिघांविरुद्ध कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़