बजाजनगरातून मुलाचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2016 00:47 IST2016-07-03T00:27:10+5:302016-07-03T00:47:42+5:30
वाळूज महानगर : बजाजनगर येथून एका अल्पवयीन शाळकरी मुलाचे अपहरण करण्यात आले असल्याची तक्रार वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

बजाजनगरातून मुलाचे अपहरण
वाळूज महानगर : बजाजनगर येथून एका अल्पवयीन शाळकरी मुलाचे अपहरण करण्यात आले असल्याची तक्रार वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
विठ्ठल त्र्यंबक लांडगे (१३, रा. आरएम- २५१ बजाजनगर), असे अपहृत मुलाचे नाव आहे. विठ्ठल हा बजाजनगरातील एका खाजगी शाळेत इयत्ता नववीत शिकतो. ३० जून रोजी नेहमीप्रमाणे सकाळी १० वाजता शाळेत गेला.
दुपारी ४ वाजता शाळा सुटल्यानंतर तो घरी आलाच नाही. त्यामुळे चिंतेत असलेल्या पालकांनी मित्र व नातेवाईकांकडे विठ्ठलची चौकशी केली असता, तो कुठेच मिळून आला नाही. दुसऱ्या दिवशी पालकांनी शाळेत जाऊन चौकशी केली असता, विठ्ठल दोन दिवसांपासून शाळेतच आला नसल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले.
त्यामुळे घाबरलेल्या पालकांनी थेट वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून अज्ञात व्यक्तीने विठ्ठलचे अपहरण केल्याची तक्रार केली. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, जमादार बी. एन. पटाईत तपास करीत आहेत.