शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

चिकलठाणा विमानतळ विस्तारीकरण; आता १४७ एकरवरील मालमत्तांचे होणार मूल्यांकन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 17:05 IST

१४७ एकर जमिनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू

छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा विमानतळ विस्तारीकरणाची प्रक्रिया गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागाने ज्या गटांमध्ये भूसंपादन करायचे आहे, त्यावर सूचना-हरकती स्वीकारल्या आहेत. आता मालमत्तांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. आठ ते दहा दिवसांत हे काम सुरू होणार आहे.

चिकलठाणा विमानतळाची धावपट्टी सध्या ९ हजार ३०० फूट आहे. मोठ्या विमानांसाठी धावपट्टीची लांबी किमान १२ हजार फूट असणे गरजेची आहे. धावपट्टी वाढविण्यासाठी १४७ एकर जमीन लागणार आहे. त्यासाठी चिकलठाणा, मुर्तुजापूर, मुकुंदवाडी या गावांतील मालमत्तांचे संपादन करण्यात येत आहे. भूसंपादनासाठी पहिल्या टप्प्यात ६६ कोटी ७८ लाखांचा निधीही प्राप्त झाला असून, १५२ कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. विशेष भूसंपादन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांनी कलम ११ (१) नुसार ५८ हेक्टरची भूसंपादनाची प्रारंभिक अधिसूचना ८ जानेवारी रोजी प्रसिद्ध केली होती. त्यावर सूचना-हरकतीवरील सुनावणी पूर्ण झाली. आक्षेपांवरील निर्णय महिनाभरात घेतले जातील, असे राठोड यांनी सांगितले.

बाधित घरांचे मूल्यविमानतळ विस्तारीकरणात काही नागरिकांच्या मालमत्ता बाधित होत आहेत. यामध्ये पक्की, कच्ची घरे, झोपड्यांचा समावेश आहे. काही झाडे, विहिरीसुद्धा आहेत. या सर्व मालमत्तेच्या मूल्यांकनाचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून करण्यात येणार आहे.

‘महसूल’ची यंत्रणा वापरणारमूल्यांकनासाठी विमानतळ प्राधिकरणाकडून मनुष्यबळ मिळणे अपेक्षित होते. प्राधिकरणाकडून मनुष्यबळ उपलब्ध झाले नाही. त्यामुळे महसूल विभागाने तलाठी, मंडळाधिकारी यांची एक टीम याकामासाठी नियुक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, बाँड पेपरवर मालमत्ता खरेदी, सातबारावर मूळ मालकाचे नाव असणे, क्षेत्र कमी असणे तर मालकी हक्क एकाकडे तर ताबा दुसऱ्यांचा अशी काही प्रकरणे समोर आल्याचे समजते.

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर