शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री पोपटासारखे बोलून वेळकाढूपणा करताहेत : निलंगेकर

By admin | Updated: September 4, 2015 00:29 IST

लातूर : मराठवाड्यावर सलग तिसऱ्या वर्षी दुष्काळाचे सावट आहे. पावसाळ्याचे तीन महिने गेले तरी पाऊस नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मात्र पाहणी करुन फक्त

लातूर : मराठवाड्यावर सलग तिसऱ्या वर्षी दुष्काळाचे सावट आहे. पावसाळ्याचे तीन महिने गेले तरी पाऊस नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मात्र पाहणी करुन फक्त आश्वासने देत आहेत. शेतकऱ्यांना सरसकट मदत करायची सोडून ते पोपटासारखे बोलून वेळकाढूपणा करीत असल्याची टिका माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर यांनी गुरुवारी लातूर येथील पत्रकार परिषदेत केली. सरकारच्या आठ महिन्याच्या काळात ५०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की, २००३-०४ साली पश्चिम महाराष्ट्रात दुष्काळी स्थिती होती. त्या वेळी मी महसूलमंत्री असताना चारा छावण्या काढल्या, पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न मिटविला. एकही मोर्चा काढण्याची वेळ येऊ दिली नाही. परंतु यंदा मराठवाड्यावर ही वेळ आली तर सरकार गंभीर नाही. मुख्यमंत्री म्हणतात की, दुष्काळी स्थितीत जनावरांच्या चारा छावण्या चालविणाऱ्या पुढाऱ्यांनीच कुरण खाल्ले आहे. जनावरांना मिळाले नाही तर तेच मोठे झाले. त्यांचे हे विधान दिशाभूल करणारे आहे. तुम्ही आत्ता काय करणार आहात ते सांगा ? मुख्यमंत्र्यांना अधिकार असतात. कॅबिनेटच्या बैठकीआधीही ते घोषणा करु शकतात. परंतु मुख्यमंत्री काहीच करित नाहीत. दुष्काळामुळे शेती करणे शेतकरी सोडून देत नाही. १९५१ साली ७२ टक्के लोक शेतीवर अवलंबून होते तर आता ५६ टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम झाला आहे. सरकारकडे पैसे नाहीत तर सरकारने कर्ज काढावे, वेळकाढूपणा करु नये, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)