शहरं
Join us  
Trending Stories
1
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
2
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
3
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
4
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
5
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
6
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
7
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
8
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
9
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
10
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
11
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
13
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
14
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
15
पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
16
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
17
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात
18
सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?
19
RO-KO च्या चाहत्यांसाठी खुशखबर! पुढील वनडे कधी खेळणार? जाणून घ्या तारीख...
20
समर्थक जिंदाबादच्या घोषणा देत असताना स्टेज कोसळला; बाहुबली नेते अनंत सिंह पडले खाली

मुख्यमंत्र्यांनी केली नवीन पाणीपुरवठा योजनेच्या जलकुंभाच्या कामाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 18:11 IST

मुख्यमंत्र्यांनी दिल्लीगेट येथे महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या निवासस्थानाजवळ जलकुंभाच्या कामाची पाहणी केली.

ठळक मुद्देयावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी कामाबद्दल समाधान व्यक्त केले.

औरंगाबाद : शहराची तहान भागविण्यासाठी १६८० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू झाले. या योजनेंतर्गत शहरात ५० पेक्षा अधिक जलकुंभ उभारण्यात येणार आहेत. शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीगेट येथील नियोजित जलकुंभाच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी संपूर्ण पाणीपुरवठा योजनेच्या कामाची माहितीसुद्धा घेतली.

दोन दशकांपासून औरंगाबादकर नवीन पाणीपुरवठा योजनेची चातकाप्रमाणे वाट पाहत होते. अखेर गुरुवारी प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात आली. गरवारे क्रीडा संकुल आणि दिल्लीगेट येथे जलकुंभ बांधण्याचे काम सुरू करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी दिल्लीगेट येथे महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या निवासस्थानाजवळ जलकुंभाच्या कामाची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. नवीन पाणीपुरवठा योजनेची संपूर्ण माहिती देणारे फलक या ठिकाणी लावण्यात आले होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी अजय सिंग, प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी नवीन पाणीपुरवठा योजनेबद्दल त्यांना थोडक्यात माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी कामाबद्दल समाधान व्यक्त केले. दिल्लीगेट येथे बांधण्यात येणाऱ्या जलकुंभांची क्षमता तीस लाख लिटर इतकी आहे. जलकुंभांची उंची २० मीटर राहणार आहे. ६३ हजार नागरिकांना या जलकुंभाचा फायदा होईल.

संजय केणेकरांना ताब्यात घेतलेभाजपाचे शहराध्यक्ष संजय केणेकर दुपारी साडेबारा वाजता दिल्लीगेट येथे कार्यकर्त्यांसह दाखल झाले. शहराचे नामांतरण आणि इतर मुद्द्यांवर आपल्याला मुख्यमंत्र्यांना निवेदन द्यायचे आहे, असा हट्ट त्यांनी धरला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. १२ डिसेंबर २०२० रोजी मुख्यमंत्री नवीन पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजनासाठी गरवारे क्रीडा संकुलावर आले होते तेव्हा केणेकर यांनी असाच हट्ट केला होता.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी