शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी टाकला विश्वास; भाजपकडून विधान परिषदेवर संजय केणेकर यांना संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 14:21 IST

गेल्या दहा वर्षांपासून विधान परिषदेवर संधी मिळण्यासाठी जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी प्रयत्नरत होते. परंतु, संजय केणेकर यांनी बाजी मारली.

छत्रपती संभाजीनगर : भाजपने विधान परिषदेच्या रिक्त जागांवर प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर यांना संधी दिली आहे. मराठवाड्यात एक आणि विदर्भात दोन अशा तीन जागांवर भाजपने रविवारी उमेदवारी जाहीर केली. त्यात केणेकर यांचे नाव असून, ते १७ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करतील. विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी २७ रोजी मतदान होईल. प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, रमेश कराड हे विधानसभेवर निवडून गेल्याने त्या जागा भाजपच्या वाट्याला आल्या. या तिन्ही रिक्त जागांचा कार्यकाळ मे २०२६ पर्यंत असल्यामुळे १३ महिन्यांची संधी भाजपच्या समीर जोशी, दादाराव कैचे आणि केणेकर यांना मिळणार आहे.

गेल्या दहा वर्षांपासून विधान परिषदेवर संधी मिळण्यासाठी जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी प्रयत्नरत होते. परंतु, केणेकर यांनी बाजी मारली. त्यामुळे भाजपमधील स्थानिक व विभागातील स्पर्धकांमध्ये नाराजीचा सूर उमटला तर केणेकर समर्थकांनी जल्लोष केला. केणेकर यांना २०१४ साली विधानसभेत संधी मिळाली नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून माघारी यावे लागले होते. त्यानंतर शहराध्यक्ष या पदावर त्यांना संधी देण्यात आली. सध्या ते प्रदेश सरचिटणीस आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीत संधी मिळेल, या अपेक्षेवर केणेकर यांनी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र पिंजून काढला. भाजपने रविवारी विधान परिषदेच्या तीन जागांसाठी घोषणा केली. यात दादाराव कैचे, संजय केणेकर आणि संदीप जोशी यांना संधी मिळाली आहे.

मायक्रो ओबीसी चेहरा...१९८८ साली अ.भा.वि.प. मधून केणेकर यांनी राजकीय प्रवास सुरू केला. पुढे भाजप वॉर्ड अध्यक्ष ते प्रदेश उपाध्यक्ष अशी १२ वर्षे संघटनात्मक काम त्यांनी केले. १५ मनपात नगरसेेवक म्हणून काम केले. उपमहापौर म्हणून पक्षाने संधी दिली. शहराध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस या पदापर्यंत त्यांनी काम केले. बी.कॉम. पर्यंत शिक्षण झालेले केणेकर सध्या ५५ वर्षांचे आहेत. मायक्रो ओबीसी चेहरा म्हणून केणेकर यांचा विचार झाला आहे.

टॅग्स :BJPभाजपाVidhan Parishadविधान परिषदchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर