मुख्याधिकारी पुजारी एकतर्फी कार्यमुक्त
By Admin | Updated: May 16, 2016 23:39 IST2016-05-16T23:37:14+5:302016-05-16T23:39:17+5:30
जालना : नगर पालिकेचे मुख्याधिकारी दीपक पुजारी यांना एकतर्फी कार्यमुक्त करण्याचे आदेश सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी काढले.

मुख्याधिकारी पुजारी एकतर्फी कार्यमुक्त
जालना : नगर पालिकेचे मुख्याधिकारी दीपक पुजारी यांना एकतर्फी कार्यमुक्त करण्याचे आदेश सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी काढले. विशेष म्हणजे तत्कालीन जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी ३ मार्च २०१६ रोजी पुजारी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठवला होता. त्यानंतर १६ मे रोजी एकतर्फी कार्यमुक्तीचा आदेश देण्यात
आला.
१६ मे रोजी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, १९ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा असल्याची माहिती देऊनही पुजारी मुख्यालयी हजर नव्हते. पाणीटंचाई असताना याकडे दुर्लक्ष केलेले आहे. त्यांचे काम समाधानकारक नाही. दीपक पुजारी हे कामात अकार्यक्षम असल्यामुळे त्यांना एकतर्फी कार्यमुक्त करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. या आदेशाची प्रत नगर विकास विभागाचे प्रधान सचिव, नगर परिषद प्रशासन संचलनालयाचे संचालक यांना पाठविण्यात आली आहे. दरम्यान उपजिल्हाधिकारी एन.आर.शेळके यांनी या आदेशाला दुजोरा दिला.