चिकुन गुनियासदृश रुग्ण वाढले

By Admin | Updated: July 18, 2014 01:53 IST2014-07-18T01:20:47+5:302014-07-18T01:53:07+5:30

शेख महेमूद तमीज , वाळूज महानगर बजाजनगरात डेंग्यू, चिकुन गुनियासदृश रुग्णांची संख्या वाढत असून अनेक रुग्ण खाजगी रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

The chicken grind affected patients increased | चिकुन गुनियासदृश रुग्ण वाढले

चिकुन गुनियासदृश रुग्ण वाढले

शेख महेमूद तमीज ,
वाळूज महानगर
बजाजनगरात डेंग्यू, चिकुन गुनियासदृश रुग्णांची संख्या वाढत असून अनेक रुग्ण खाजगी रुग्णालयांत उपचार घेत आहेत.
बजाजनगर या कामगार वसाहतीत अजिबात स्वच्छता नाही. या परिसरात खाजगी ठेकेदार साफसफाईचे काम करतात. एमआयडीसीचे काही अधिकारी व ठेकेदारांत हातमिळवणी असल्यामुळे कागदोपत्री स्वच्छता दाखविली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या कामगार वसाहतीतील ड्रेनेज लाईनचे काम रखडल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. विविध सेक्टर्समध्ये असलेल्या ड्रेनेज लाईनचे सेफ्टी टँक चोकअप होत असल्यामुळे सांडपाणी उघड्यावर साचत आहे. गेल्या १५ दिवसांपासून या परिसरात साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. ताप येणे, मळमळ होणे, थंडी वाजणे, अंग व सांधे दुखणे आदींच्या तक्रारी होत आहेत. बजाजनगरातील सिमेन्स कॉलनी, कणकधारा सोसायटी, काबरा रेसिडेन्सी, श्री गणेशाय गृहनिर्माण संस्था, स्वाध्याय केंद्र परिसरात साथीच्या आजारांचे रुग्ण आढळले आहेत.
आरोग्य विभाग व एमआयडीसीच्या दुर्लक्षामुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे, असे बालाजी खेत्रे, संजय देवकर, चेतन पवार, वंदना कैलास कदम, प्रतीक उमेश पवार, माधवी प्रभू पेठकर या उपचार घेत असलेल्या रुग्णांनी सांगितले. याविषयी दौलताबाद प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एस.बी. बामणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बजाजनगरात डेंग्यूचा एक रुग्ण व ६ संशयित रुग्ण आढळल्याचे ‘लोकमत’ला सांगितले.
बजाजनगरात डेंग्यूसदृश व साथीच्या आजारांचे अनेक रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. या रुग्णांच्या प्लेटलेटस्ची संख्या कमी होत असल्याचे डॉ. प्रशांत टेमक पाटील, डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले. सध्या रुग्णालयात डेंग्यूसदृश आजारांचे रुग्ण दाखल होत असल्याची माहिती डॉ. टेमक पाटील यांनी दिली.
आरोग्य विभागातर्फे सर्वेक्षण
बजाजनगरात डेंग्यूसदृश व साथीच्या आजारांचे रुग्ण वाढल्याच्या तक्रारी आल्यामुळे आरोग्य विभागाने १४ जुलैपासून बजाजनगरमध्ये सर्वेक्षण सुरू केले असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. यू.पी. गंडाळ यांनी सांगितले. ते म्हणाले की, खाजगी रुग्णालयांत असलेल्या रुग्णांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांना स्वच्छतेचे महत्त्व सांगण्यात येत आहे.
घराचा परिसर स्वच्छ ठेवा, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिन पाळा याची माहिती सांगितली जात आहे.
साफसफाईसाठी ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा करण्यात आला आहे.
अस्वच्छतता वाढली
मी बजाजनगरातील सिमेन्स कॉलनीत राहत. एमआयडीसी प्रशासनाकडून नियमितपणे स्वच्छता केली जात नाही. कचरा व सांडपाण्याच्या गटारी तुडुंब भरल्याने साथीचे आजार वाढत आहेत.
-वंदना कदम, रुग्ण
रुग्णांची संख्या वाढली
अस्वच्छतेमुळे बजाजनगरातील रहिवाशांना साथीचे आजार होत आहेत. प्रत्येक कुटुंबातील किमान एका जणाला तरी साथीचा आजार आहे. स्वच्छतेकडे एमआयडीसी लक्ष देत नाही.
-रघुनाथ पवार, रहिवासी
रस्त्यावर कचरा टाकतात
बजाजनगरात आरएच-७ मध्ये अनेक दिवसापांसून औषध फवारणी करण्यात आलेली नाही. बहुतांश ठिकाणी कचराकुंड्यांची व्यवस्था नसल्यामुळे नागरिक रस्त्यावरच केरकचरा आणून टाकतात.
-माधवी प्रभू पेठकर, रुग्ण

Web Title: The chicken grind affected patients increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.