शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
2
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
3
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
4
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी;अनेकांची गेली दृष्टी,७ जणांची मृत्यूशी झुंज
5
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
6
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
7
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
8
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
9
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
10
वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
11
‘लोक माझ्यावर जळतात, माझ्याविरोधात…’, पराभवानंतर अजिंक्य रहाणे संतापला, टीकाकारांवर बरसला
12
Peace Of Mind: नातं की ओझं? भगवान बुद्धांच्या 'या' एका सूत्राने दूर होईल तुमच्या मनातील सर्व गोंधळ!
13
Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?
14
गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…
15
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
16
Ashok Kharat : भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा
17
आता इंधनाबरोबरच खतांचं टेन्शनही संपणार! संकट काळात 'खास मित्र' भारताच्या मदतीला, PM मोदींना भेटून दिलं मदतीचं आश्वासन
18
'पीएम किसान'चे २,००० रुपये खात्यात जमा होण्यासाठी 'या' ३ अटी पूर्ण करणे अनिवार्य; मोबाईलवरुनही प्रोसेस होईल
19
अमेरिकेचे F-35 विमान इराणने पाडले! १५ दिवसांत दुसऱ्या फायटर जेटचा गेम; युद्धभूमीवर खळबळ
20
वर्षभरानंतर सतीश भोसले उर्फ 'खोक्या' तुरुंगाबाहेर; मारहाण प्रकरणात न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
Daily Top 2Weekly Top 5

छ. संभाजीनगरमध्ये पोलीस उपायुक्तांच्या मुलाने आयुष्य संपविले; आई - बाबांसाठी आरशावर लिहिली नोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 09:35 IST

सकाळी वडील मार्निंग वॉकला बाहेर जाण्यासाठी निघाले असता, तेव्हा मुलाने बेडरूममध्येच आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला.

लोकमत न्यूज नेटवर्क,छत्रपती संभाजीनगर : बारावीत शिकणाऱ्या साहिल शीलवंत नांदेडकर (१७, रा. स्नेहनगर) याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे रविवारी (दि.१३) सकाळी ६ वाजता उघडकीस आले. शहर पोलिस दलातील पोलिस उपायुक्त (प्रशासन) शीलवंत नांदेडकर यांचा साहिल हा मुलगा आहे. यामुळे पोलिस प्रशासनात खळबळ उडाली आहे. 

साहिल हा आयआयटीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी जेईई अॅडव्हान्स परीक्षेची तयारी करीत होता. तो अभ्यासातही अतिशय हुशार होता. मात्र, टोकाचे पाऊल उचलल्यामुळे त्याच्या नातेवाइकांसह संपूर्ण शहर पोलिस प्रशासनालाच धक्का बसला आहे. याप्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साहिल आई-वडिलांसह शनिवारी रात्री उशिरापर्यंत सोबत होता. सकाळी वडील मार्निंग वॉकला बाहेर जाण्यासाठी निघाले असता, तेव्हा मुलाने बेडरूममध्येच आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यांनी  तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी तपासून त्याला मृत घोषित केले. साहिलवर प्रतापनगर स्मशानभूमीत दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वरिष्ठ पोलिस अधिकारी, निरीक्षक, राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील नागरिकांची उपस्थिती होती. साहिलच्या पश्चात आई, वडील, आजी, आजोबा आहेत. 

आरशावर लिहिली चिठ्ठी...आत्महत्येपूर्वी घरातील आरशावर साहिलने नवीन जीवनाला सुरुवात करीत असल्याचे लिहीत आई- वडिलांविषयी प्रेम व्यक्त केले आहे. 

टॅग्स :Policeपोलिस