शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

जिवे मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षावर बलात्काराचा गुन्हा

By बापू सोळुंके | Updated: May 7, 2023 17:25 IST

आरोपीने तिची अश्लील व्हिडिओ क्लीप बनविली आणि क्लीप सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीही दिली.

बापू सोळुंके

छत्रपती संभाजीनगर : पती आणि मुलांचे अपहरण करून त्यांना जिवे मारण्याची धमकी देत शहर राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष असलेल्या एका नराधमाने विवाहितेवर अत्याचार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. १२ मार्च रोजी टाऊन हॉल, नूर कॉलनीत ही घटना घडली होती.

या प्रकाराची तिने वाच्यता करू नये, म्हणून आरोपीने तिची एक अश्लील व्हिडिओ क्लीप बनविली होती. ही व्हिडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीही त्याने दिली होती. याविषयी सिटी चाैक पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात बलात्कार आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा पोलिसांनी नोंदविला. मुख्तार खान ऊर्फ बब्बू (४२ ,रा. नूर कॉलनी, टाऊन हॉल) असे आरोपीचे नाव आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून मुख्तार ऊर्फ बब्बू खान वावरत असतो. शहरात पती आणि दोन लेकरांसह राहणाऱ्या पीडितेवर त्याची मार्च महिन्यात नजर पडली. तेव्हा तो तिचा पाठलाग करीत तिच्या घरापर्यंत जाऊ लागला. तिला पाहून अश्लील इशारे करू लागला. पीडिता दवाखान्यात अथवा अन्य कोठे जाण्यासाठी घराबाहेर पडल्यानंतर तो तिला गाठून तिची मुले आणि पतीचे अपहरण करून त्यांना जिवे मारण्याची तसेच तिचा संसार उद्ध्वस्त करण्याची धमकी देत असे.

१२ मार्च रोजी त्याने तिला अशाच धमक्या देऊन त्याच्या टाऊन हॉल येथील घरी बोलावले. तेथे तिला गुंगीचे औषध टाकलेले पाणी दिले. हे पाणी पिऊन ती बेशुद्ध पडल्यानंतर त्याने तिच्यावर नैसर्गिक आणि अनैसर्गिक अत्याचार करून त्याच्या मोबाईलवर आक्षेपार्ह व्हिडिओ क्लीप बनविली. हा प्रकार कोणाला सांगितल्यास ही व्हिडिओ क्लीप समाजमाध्यमावर व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी त्याने दिली.

नातेवाईकांनी धीर दिल्याने पोलिसांत धाव

यामुळे पीडिता प्रचंड घाबरली होती. घटनेपासून ती मानसिकदृष्ट्या खचली होती. नातेवाईकांनी तिला विश्वासात घेऊन विचारल्यानंतर बब्बू खानने केलेल्या अत्याचाराची माहिती तिने दिली. त्याच्या धमक्यांना न घाबरता त्यांनी शनिवारी रात्री सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा नोंदविला. पोलीस निरीक्षक विठ्ठल पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड तपास करीत आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादNCPराष्ट्रवादी काँग्रेसCrime Newsगुन्हेगारी