शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
3
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
4
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
5
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
6
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
7
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
8
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
9
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
10
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
11
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
12
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
13
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
14
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
15
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
16
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
17
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
18
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
19
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
20
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक नेत्यांनी हात टेकले, छत्रपती संभाजीनगरचा 'पेच' आता फडणवीस-शिंदेंच्या दरबारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 19:14 IST

मागील आठ दिवसांपासून सुरू असलेले बैठकांचे सत्र आणि आज शनिवारी झालेली ५ तासांची मॅरेथॉन बैठक होऊनही भाजप आणि शिंदेसेनेमध्ये काही जागांवरून एकमत होऊ शकले नाही.

छत्रपती संभाजीनगर: आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे. मागील आठ दिवसांपासून सुरू असलेले बैठकांचे सत्र आणि आज शनिवारी झालेली ५ तासांची मॅरेथॉन बैठक होऊनही भाजप आणि शिंदेसेनेमध्ये काही जागांवरून एकमत होऊ शकले नाही. अखेर हा पेच सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धाव घेण्याचा निर्णय स्थानिक नेत्यांनी घेतला आहे.

नेमकं कुठे अडलंय घोडे?

आज पार पडलेल्या बैठकीत महायुतीचे स्थानिक नेते काही ठराविक जागांवरून अडून बसले होते. भाजप आणि शिंदेसेना दोन्ही पक्ष स्वतःच्या बालेकिल्ल्यावर दावा सोडायला तयार नसल्याने पाच तासांच्या चर्चेनंतरही अंतिम तोडगा निघाला नाही. "आम्ही आमची बाजू मांडली आहे, पण काही जागांवर सामंजस्य न झाल्याने आता हा निर्णय वरिष्ठ पातळीवर व्हावा, अशी आमची इच्छा आहे," असे संकेत पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिले.

वरिष्ठांना पाठविले पत्र या जागावाटपाचा तिढा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोर्टात गेला आहे. या तिन्ही नेत्यांना सविस्तर पत्र पाठवून निर्णय घेण्याची विनंती करण्यात आली आहे. पालकमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, महायुती भक्कम आहे, परंतु जागावाटपाच्या तांत्रिक अडचणींमुळे हा विलंब होत आहे. लवकरच मुंबईतून यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Chhatrapati Sambhajinagar seat-sharing deadlock: Fadnavis-Shinde to decide now.

Web Summary : Seat-sharing talks between BJP and Shinde's Sena for Chhatrapati Sambhajinagar municipal elections remain unresolved. Deadlock over key constituencies led local leaders to seek intervention from Fadnavis and Shinde. A final decision is expected soon from Mumbai after senior leaders review the matter.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Electionछत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक २०२६BJPभाजपाShiv Senaशिवसेना