शहरं
Join us  
Trending Stories
1
Maratha Morcha: मनोज जरांगेंच्या मागण्यांवर मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत काय झाला निर्णय?
2
चीन-भारत संबंधांना तिसऱ्या देशाच्या नजरेची गरज नाही, मोदी आणि जिनपिंग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले
3
राहुल गांधींच्या 'मतदार हक्क यात्रेत' वापरलेली बाईक गायब, मालक चिंतेत; बुलेटही लॉक अवस्थेत सापडली
4
Maratha Reservation : 'मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देता येईल हे शरद पवारांनी जाहीर करावं'; राधाकृष्ण विखे- पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
Supriya Sule: मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंची गाडी अडवली, घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला
6
"जीव धोक्यात घालू नका"! मरीन ड्राईव्हवर शेकडो मराठा आंदोलक समुद्रकिनारी खडकांवर उतरले
7
२० तासांचा रहस्यमय प्रवास! चीनला पोहचण्यासाठी किम जोंग यांची सीक्रेट तयारी; शत्रूंना देणार चकवा
8
Maratha Morcha Mumbai: 'मी आयुक्तांना बोलते'; सुप्रिया सुळेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट
9
भाजपच्या माजी आमदार, माजी IPS अधिकाऱ्यासह १४ जणांना जन्मठेप; बिल्डर अन् १२ कोटींचं प्रकरण काय?
10
बाबर आझमची 'मॅचविनिंग' खेळी; शोएब अख्तर, वकार युनिससारख्या दिग्गजांची केली धुलाई
11
ओबीसीतून आरक्षण घेणारच, उद्यापासून पाणीही घेणार नाही; मनोज जरांगे पाटील यांची घोषणा
12
तमिळ सुपरस्टार विशालच्या साखरपुड्याचे फोटो पाहिलेत का? १२ वर्षांनी लहान आहे होणारी पत्नी
13
'नरेंद्र मोदींनी चीनला क्लीन चिट दिली', पंतप्रधानांच्या चीन दौऱ्यावरुन काँग्रेस आक्रमक
14
जिओ की वीआय? रोजच्या २.५GB डेटासाठी कोणता प्लॅन स्वस्त? जाणून घ्या दोन्ही कंपन्यांचे फायदे आणि किंमत
15
बदलापुरात पोलीस कॉन्स्टेबल श्रावणी वारिंगेंनी तिसर्‍या मजल्यावरून मारली उडी; कारण काय?
16
Gauri Pujan 2025: गौराईला नैवेद्य अर्पण करण्याआधी ताटाखाली काढा पाण्याचे मंडल आणि म्हणा 'हा' मंत्र
17
"मराठा जातीने मागास नाहीत, न्यायालयात अडकवायचं आहे का?"; पाटलांनी सांगितला ओबीसी आरक्षण देण्यातील अडथळा
18
Mumbai: पर्यावरणपूरक मूर्तीच्या नैसर्गिक जलस्रोतात विसर्जनास परवानगी
19
१५ वर्षीय मुलीच्या मागेच लागला साप; १ महिन्यात ६ वेळा चावला, प्रत्येकवेळी पायावर खुणा सोडल्या
20
दिग्गज क्रिकेटपटूच्या लेकीची मैदानात एन्ट्री; चाहत्यांना सौंदर्याने घायाळ करणारी 'ती' कोण?

छत्रपती संभाजीनगरकरांना नवीन वर्षात दररोज पाणी मिळेल पण...मीटरही लावणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 20:00 IST

आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्याचे आदेश

छत्रपती संभाजीनगर : नवीन वर्षात शहराला दररोज पाणी देण्याचे उद्दिष्ट मनपा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने डोळ्यासमोर ठेवले आहे. जानेवारी २०२६ पासून शहरात दररोज किमान ३७१ एमएलडी पाणी येईल. त्यामुळे नागरिकांना दररोज पाणी देणे सहज शक्यही होईल. त्यापूर्वी प्रत्येक नळाला मीटर बसविण्याची योजना असून, त्यासाठी डीपीआर (प्रकल्प आराखडा) तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी खासगी कन्सल्टंट नेमण्याचे आदेश मनपा प्रशासकांनी दिले.

२७४० कोटी रुपये खर्च करून नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचे काम जवळपास ८५ टक्के पूर्ण झाले. या योजनेचा पहिला टप्पा डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यातून शहराला वाढीव २०० एमएलडी पाणी येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नवीन वर्षात पाणी देण्याचे आदेश दिले. त्या दृष्टीने यंत्रणा कामाला लागली आहे. जुन्या पाणीपुरवठा योजनेतून सध्या शहराला १७१ एमएलडी पाणी मिळत आहे. पुढील काही महिन्यांमध्ये किमान ३० जलकुंभ नवीन बांधले जातील. याचाही वापर केला जाईल. ज्या भागात जलवाहिन्या नव्हत्या, त्या भागात जवळपास १२०० किमी लांबीच्या जलवाहिन्याही टाकण्यात आल्या. गुंठेवारी भागातील या नवीन वसाहतींनाही दररोज पाणी दिले जाईल. सध्या महापालिकेकडून २५०० रुपये पाणीपट्टी घेतली जाते. योजना पूर्ण झाल्यावर शहरवासीयांना दररोज पाणी मिळणार आहे. या योजनेवर वॉटर मीटर लावून पाण्याचे बिल वसूल केले जाईल. महापालिकेने त्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.

मीटर वादाचा विषय ठरणारस्मार्ट सिटीमार्फत मनपाने यापूर्वी ५ हजार स्मार्ट वॉटर मीटर खरेदी केले. याचा उपयोगच झाला नाही. ते मीटर आजही पडून आहेत. आता नवीन कंपनी शोधून वॉटर मीटर बसविले जातील. त्यामुळे नागरिक, राजकीय मंडळींचा रोष वाढेल. वॉटर मीटरसाठी निविदा प्रक्रिया राबविणे, मीटरचा प्रकार, सॉफ्टवेअर, बिलिंगची प्रक्रिया, नियंत्रण ठेवण्यासाठी कॉमन कंट्रोल सेंटर इ. तयार करावे लागेल. या सर्व कामांचा एक डीपीआर आधी तयार केला जाईल. तो तयार करण्यासाठी कन्सल्टंट नेमण्याचे आदेश प्रशासकांनी पाणीपुरवठा विभागाला दिले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरWaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका