शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सत्तार, भूमरे आणि चव्हाण घराण्याचा 'विजयाभिषेक'; नव्या पिढीची झेडपीमध्ये दिमाखदार एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 16:11 IST

दिग्गज नेत्यांच्या वारसांनी राखलं वर्चस्व, छत्रपती संभाजीनगरमध्ये युवा वारसांची सरशी.

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांच्या वारसांनी बाजी मारत आपले राजकीय वर्चस्व अबाधित राखले आहे. शिंदेसेनेचे खासदार संदीपान भूमरे, आमदार अब्दुल सत्तार आणि भाजपच्या आमदार अनुराधा चव्हाण यांच्या कुटुंबातील युवा नेतृत्वाने आपापल्या बालेकिल्ल्यात विजयाची पताका फडकावली आहे. नेत्यांच्या वारसांना मिळालेली ही संधी आगामी राजकारणाची नवी दिशा ठरवणारी ठरेल.

सिल्लोडमध्ये आमेर सत्तारांचा भाजपला धक्का सिल्लोडमध्ये पुन्हा एकदा आमदार अब्दुल सत्तार यांची जादू चालली आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या अंभई गटात अब्दुल सत्तार यांचे सुपुत्र आमेर सत्तार यांनी भाजपचे उमेदवार त्र्यंबक मारुती गव्हाणे यांचा पराभव केला. या विजयाने सिल्लोडमधील सत्तारांचे एकतर्फी वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून भाजपला या ठिकाणी पुन्हा एकदा पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे.

पाचोडमध्ये शिवराज भूमरेंचा 'महाविजय' राज्याचे माजी मंत्री आणि विद्यमान खासदार संदीपान भूमरे यांचे पुतणे शिवराज भूमरे यांनी पाचोड गटात आपला दबदबा कायम ठेवला आहे. भूमरे घराण्याची ताकद विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे विलास शेळके यांच्यातील ही लढत लक्षवेधी ठरली होती. अखेर मतदारांनी शिवराज भूमरे यांच्या बाजूने कौल देत राष्ट्रवादीचे आव्हान मोडीत काढले.

गणोरीत निखिल चव्हाणांनी थोपवली महाविकास आघाडी भाजपच्या आमदार अनुराधा चव्हाण यांचे पुतण्या निखिल चव्हाण यांनी गणोरी गटात विजय संपादन केला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप बोरसे यांनी दिलेली मोठी टक्कर निकामी ठरवत निखिल चव्हाणांनी संघर्षपूर्ण विजयाची नोंद केली.

टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरSandipan Bhumreसंदीपान भुमरेAbdul Sattarअब्दुल सत्तारBJPभाजपाShiv Senaशिवसेना