शहरं
Join us  
Trending Stories
1
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
2
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
3
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
4
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
5
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
6
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
7
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
8
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
9
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
10
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
11
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
12
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
13
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
14
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
16
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
17
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
18
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
19
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
20
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

‘इसिस’च्या संपर्कातील छत्रपती संभाजीनगरचा तरुण अटकेत; देशभरातील स्थळांची केली होती रेकी

By सुमित डोळे | Published: February 16, 2024 4:07 PM

छत्रपती संभाजीनगरात नऊ ठिकाणी छापे; हर्सूलमधून तरुणाला अटक

छत्रपती संभाजीनगर : आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना ‘इसिस’ने तरुणांची भरती करण्यासाठी शहरात पाळेमुळे रोवण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) तपासात ही बाब निष्पन्न झाली. सात महिन्यांपासून शहरातील काही तरुणांवर एनआयए पाळत ठेवून होते. गुरुवारी पहाटेच दोन पथकांनी शहरात नऊ ठिकाणी छापे मारत हर्सूलच्या बेरीबाग परिसरातील गल्ली क्रमांक चारमधून मोहम्मद झोहेब खान (४०) याला अटक केली. मोहम्मद झोहेब गेल्या दोन वर्षांपासून इंटरनेटच्या माध्यमातून इसिसच्या आंतरराष्ट्रीय हस्तकांच्या संपर्कात आल्याचे सबळ पुरावे यंत्रणेच्या हाती लागले आहे.

गेल्या सात महिन्यांपासून एनआयए मोहम्मदवर पाळत ठेऊन हाेते. सोशल मीडियाद्वारे मोहम्मद झोहेब सातत्याने इसिसचा प्रचार करताना निष्पन्न झाला होता. त्यानंतर त्याच्यावर एनआयएच्या मुंबई विभागाने गुन्हा दाखल करण्यात आला. गुरुवारी पहाटेच दोन पथक शहरात दाखल झाले. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना संपर्क करून मुख्यालयातील काही कर्मचाऱ्यांना सोबत घेत त्यांनी नऊ ठिकाणी छापे मारले. त्यानंतर शेवटी मोहम्मद झोहेबला दुपारी अटक केली. सोशल मीडियाद्वारे तो सहकाऱ्यांसह तरुणांना कट्टरवादाकडे वळवून इसिसमध्ये भरती करण्यासाठी उद्युक्त करत होते. या कारवाईमुळे मात्र शहर पोलिस दल, एटीएस विभाग खडबडून जागा झाला. रात्री उशिरापर्यंत अन्य तपास यंत्रणा झोहेबचे शहरातील मित्र, नातेवाइकांकडे चौकशी करत होते.

सोशल मीडियातून होते संपर्कातएनआयएकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, झोहेब व त्याचे सहकारी मित्र गेल्या काही महिन्यांपासून देशभरातील इसिसच्या संपर्कात होतेच. त्याशिवाय, ते इसिस व विदेशातील दहशतवादी संघटनांच्या एजंटसोबत सातत्याने संपर्कात होते. त्यासाठी सोशल मीडियावरील विविध माध्यमांचा वापर करून ते कॉल, मेसेजवर उर्दू व इंग्रजी भाषेतून संवाद साधत होते.

लॅपटॉप, मोबाइल जप्त, इसिसचे पुस्तकेही आढळलीएनआयए च्या पथकाने झोहेबच्या घरात लॅपटॉप, मोबाइल जप्त केले. शिवाय, जिहाद, इसिस व कट्टरवादाचे पुस्तकेदेखील आढळून आले. सिरियाला स्थलांतर करण्याची माहिती असलेले कागदपत्रे देखील झोहेबकडे होते. पथकाने ते सर्व जप्त केले. इसिसची 'बायथ' म्हणजेच इसिसचा उद्देश सार्थ करण्यासाठी घेतलेल्या शपथेचा व्हिडिओदेखील पथकाला मिळून आल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

कट रचणे सुरू होते, महत्त्वाचे स्थळ लक्षसिरियाला जाण्यासोबतच दहशतवादाकडे वळालेला झोहेब व त्याच्या मित्रांकडून देशातील काही महत्त्वाच्या स्थळ, इमारतींना व ऐतिहासिक स्थळांना लक्ष केले जाणार होते. त्या अनुषंगाने त्यांचा अन्य राज्यातील इसिस समर्थकांसोबत कट रचणे सुरू होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीISISइसिसAurangabadऔरंगाबाद