शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

छत्रपती संभाजीनगर ते पुणे एक्स्प्रेस-वे होणार तीन फेसमध्ये; दोन टप्प्यांसाठी १४ हजार कोटी मंजुर

By विकास राऊत | Updated: September 24, 2024 19:08 IST

या मार्गासाठी २ हजार ६३३ हेक्टर जमीन संपादन करण्यात येईल. तीन फेसमध्ये महामार्गाचे काम होणार आहे.

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर ते पुणे हा नवीन द्रुतगती महामार्ग (एक्स्प्रेस-वे) २५ हजार कोटींतून बांधण्यात येणार असला तरी पहिल्या दोन टप्प्यांनाच (फेस : १ व २) सोमवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. शिरूर ते छत्रपती संभाजीनगर या २०५ किलोमीटरच्या द्रुतगती मार्गास १४ हजार ८८६ कोटी रुपये खर्च येईल. या मार्गाचे काम बीओटी तत्त्वावर करण्यात येईल. काम पूर्ण झाल्यानंतर २००८ च्या पथकर धोरणानुसार वाहनांवर पथकर लावण्यात येईल. या मार्गासाठी २ हजार ६३३ हेक्टर जमीन संपादन करण्यात येईल. तीन फेसमध्ये महामार्गाचे काम होणार आहे. पहिल्या दोन फेसमध्ये छत्रपती संभाजीनगर ते शिरूरपर्यंत मार्ग असेल. शिरूर ते पुणे या मार्गाचे काम तिसऱ्या फेसमध्ये होणार आहे. दोन फेससाठी १४ हजार ८८६ कोटी, तर तिसऱ्या फेससाठी १० हजार कोटींचा खर्च येईल. परंतु, त्याचा निर्णय सोमवारच्या बैठकीत झाला नाही.

या गावांतून जाणार मार्गछत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गाच्या भूसंपादनासाठी अधिसूचना ३ (ए) काढून २१ महिने झाले. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील पीरवाडी, हिरापूर, सुंदरवाडी, झाल्टा, आडगाव बुद्रुक, चिंचोली, घारदोन, तर पैठण तालुक्यातील वरवंडी खुर्द, पारगाव, डोणगाव, बालानगर, कापूसवाडी, वडाळा, बवा, वरुडी बुद्रुक, पाचळगाव, नारायणगाव, करंजखेडा, आखतवाडा, वाघाडी, दडेगाव जहाँगीर, पोटगाव, सायगाव, पैठण परिसरातून हा मार्ग प्रस्तावित आहे. बिडकीनमध्ये अलायन्मेंट बदलण्यात येणार आहे.

येत्या आठवड्यात अध्यादेश निघेल५ सप्टेंबरच्या कॅबिनेटमध्ये या मार्गाऐवजी जुन्या छत्रपती संभाजीनगर ते पुणे रस्त्याबाबत चर्चा होऊन नूतनीकरणाची तरतूद केली होती. त्यानंतर २३ सप्टेंबरच्या कॅबिनेटमध्ये एक्स्प्रेस-वेचा सुधारित प्रस्ताव ठेवण्यात आला. जून २०२४ मध्ये महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडून या मार्गाचे काम करण्यासाठी एनएचएआय आणि शासनामध्ये करार झाला. छत्रपती संभाजीनगर, अहिल्यादेवीनगर (अहमदनगर), पुणे हे तीन जिल्हाधिकारी कार्यालय आणि एमएसआयडीसी समन्वयाने भूसंपादन करतील. येत्या आठवड्यात कामाचा अध्यादेश निघेल, असे महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकार