शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगर ते पुणे एक्स्प्रेस-वे अलाइन्मेंट बदलणार, थेट 'समृद्धी' महामार्गला जोडणार

By विकास राऊत | Updated: September 5, 2024 19:57 IST

पूर्वीचे अलाइन्मेंट रद्द होणार असल्याची चर्चा; यासाठी बदलणार अलाइन्मेंट?

छत्रपती संभाजीनगर : एनएचएआय आणि एमएसआरडीसीने केलेले पुणे ते छत्रपती संभाजीनगर या एक्स्प्रेस-वेचे जुने अलाइन्मेंट बदलण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. छत्रपती संभाजीनगर ते पुणे एक्स्प्रेस-वेसाठी एनएचएआय-एमएसआयडीसीमध्ये जून महिन्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. असे असताना जुने अलाइन्मेंट बदलण्याची चर्चा सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर ते पुणे हे २२५ किमी अंतर दोन ते सव्वादोन तासांत पूर्ण करता येईल. असा हा नवीन मार्ग असेल. त्यासाठी अलाइन्मेंट अंतिम होत आहे. छत्रपती संभाजीनगर ते शिरूरपर्यंत चार टोलनाके असतील. टोलच्या उत्पन्नातून विद्यमान छत्रपती संभाजीनगर, नगर ते पुणे हा रस्ता चांगला करण्यात येणार आहे. नागपूर ते जालना समृद्धीमार्ग व पुढे छत्रपती संभाजीनगर ते पुणे नवीन महामार्गावरून साडेचार तासांत प्रवास होणे शक्य होईल, असा दावा करण्यात येत आहे.

छत्रपती संभाजीनगर ते पुणे या नवीन (एक्स्प्रेस-वे) या २२५ किमीच्या द्रूतगती महामार्गाला २६ महिन्यांनी मंजुरी दिल्यावर बीओटीवर हा सहापदरी मार्ग बांधण्याचे निश्चित झाले. २५ हजार कोटींच्या या प्रकल्पासाठी एनएचएआय आणि एमएसआयडीसीमध्ये सोमवारी सामंजस्य करार जूनमध्ये झाला. महाराष्ट्र पायाभूत सुविधा महामंडळाकडे (एमएसआयडीसी) हा रस्ता हस्तांतरित केला. ३ हजार कोटींचे कर्ज हुडकोकडून उपलब्ध होईल.

असे आहे अलाइन्मेंटबिडकीनला जोडणारे अलाइन्मेंट बदलण्यात येणार आहे. आधीचे अलाइन्मेंट जोड रस्त्याला बिडकीन वसाहतीच्या दक्षिण-पूर्व टोकाला जोडणार होती. नवीन अलाइन्मेंटनुसार बिडकीनला जोडणारा रस्ता छत्रपती संभाजीनगर-पुणे एक्स्प्रेसवेवरून बिडकीन ऑरिक वसाहतीच्या लगत थेट पैठण रस्त्याला जोडेल आणि पुढे वाळूज च्या दक्षिण-पश्चिम दिशेने समृद्धी महामार्गाला जोडण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. असे झाल्यास बिडकीन नोड थेट समृद्धी महामार्गाला जोडले जाईल.

यासाठी बदलणार अलाइन्मेंटजालना रस्त्यावरील केम्ब्रिज शाळेपासून सुरू होणारे अलाइन्मेंट शहरातील प्रवाशांसाठी सोयीचे नव्हते आणि पुण्याच्या विरुद्ध दिशेने प्रवासाला सुरुवात करावी लागली असती. आता नवीन बदलामुळे पैठण रोड, बिडकीन जोड रस्त्याने थेट या द्रूतगती महामार्गाला जाता येईल, यामुळे प्रवासाचे अंतर कमी होईल. केंब्रिज शाळेलगत सुरू होणार रस्ता समृद्धीला जोडण्यात येईल. तसेच, शेंद्रा वसाहत, बिडकीन, कसाबखेडा, असा अर्धवर्तुळाकार बायपास झाल्यास, शहरालगत गोलाकार बाह्यवळण रस्ता निर्माण होईल.

एनएचएआयचे मत असेछत्रपती संभाजीनगर ते पुणे या रस्त्याचे काम आमच्याकडे नाही, परंतु जुने अलाइन्मेंट बदलले की नाही, हे माहिती नाही. तसे तर बदलता येत नाही, परंतु काही धोरण असेल तर बदलता येऊ शकते, असे मत एनएचएआयच्या वरिष्ठ सूत्रांनी व्यक्त केले.

एमएसआरडीसी काय म्हणतेएनएचएआयकडे जेव्हा हा रस्ता देण्यात आला होता, त्यावेळेस भूसंपादन अथॉरिटी म्हणून राज्य रस्ते विकास महामंडळाकडे जबाबदारी देण्यात आली होती, परंतु दोन महिन्यांपूर्वी राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे त्या रस्त्याचे काम एका कराराने वर्ग झाले आहे. त्यामुळे अलाइन्मेंट व भूसंपादनाशी एमएसआरडीसीचा काही संबंध नाही.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPuneपुणेSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्गhighwayमहामार्ग