छत्रपती संभाजीनगर: शहरातील पैठण रोडवर सोमवारी सायंकाळी एका भरधाव हायवा ट्रकने कारला चिरडल्याची भीषण घटना घडली. वाळूची अवैध वाहतूक करणारा हा हायवा ट्रक इतक्या वेगात होता की, चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो थेट रस्त्यावरून जाणाऱ्या कारवर उलटला. या भीषण अपघातात कारचा पूर्णतः चक्काचूर झाला असला, तरी सुदैवाने कारमधील दोन्ही प्रवाशांचे प्राण वाचले आहेत.
जागरूक नागरिकांमुळे वाचले प्राणमिळालेल्या माहितीनुसार, हायवा कारवर उलटत असताना एका प्रवाशाने प्रसंगावधान राखून चालत्या कारमधून बाहेर उडी मारली. मात्र, दुसरा प्रवासी कारमध्येच अडकला होता. अपघात घडताच परिसरातील जागरूक नागरिकांनी तातडीने धाव घेत मोठ्या शर्थीने अडकलेल्या प्रवाशाला सुखरूप बाहेर काढले. या थरारक अपघातामुळे पैठण रोडवर काही काळ वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती.
वाळूमाफियांच्या विरोधात संतापहा अपघात अनियंत्रित आणि अवैध वाळू वाहतुकीमुळे झाल्याचा गंभीर आरोप प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी केला आहे. पैठण रोडवर वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांचा वेग प्रचंड असतो आणि त्यांच्यावर प्रशासनाचा कोणताही वचक नसल्याचे नागरिकांनी संताप व्यक्त करताना सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अधिक तपास सुरू आहे.
Web Summary : A speeding sand truck crushed a car on Paithan Road, Chhatrapati Sambhajinagar. Passengers miraculously survived as locals rescued one trapped inside. Illegal sand transport and lack of regulation are blamed. Police are investigating the incident.
Web Summary : छत्रपति संभाजीनगर के पैठण रोड पर रेत से भरे ट्रक ने कार को कुचल दिया। यात्रियों को चमत्कारिक ढंग से बचाया गया, स्थानीय लोगों ने एक फंसे हुए व्यक्ति को बचाया। अवैध रेत परिवहन और विनियमन की कमी को दोषी ठहराया गया। पुलिस जांच कर रही है।