शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

३०० वर्ष जुन्या वृक्षांवर कुऱ्हाड; छावणी नाका-देवगिरी टी पॉईंट रस्ता रुंदीकरणाला पर्यावरणप्रेमींचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 20:02 IST

यातील काही वृक्ष ५० वर्षांपासून तब्बल ३०० वर्षांपर्यंत वयाचे असल्याने ते ऐतिहासिक वारसा वृक्ष (हेरिटेज ट्री) मानले जातात.

छत्रपती संभाजीनगर : छावणी नाका ते देवगिरी टी पॉईंट या मार्गाच्या प्रस्तावित रस्ता रुंदीकरणासाठी प्रशासन आणि स्थानिक मंत्री आग्रही असताना या निर्णयावर पर्यावरणप्रेमींनी तीव्र आक्षेप घेतला आहे. या मार्गावर मोठी झाडे असून त्यामध्ये वड, पिंपळ, महारुख, लिंब, आदी प्रजातींचा समावेश आहे. यातील काही वृक्ष ५० वर्षांपासून तब्बल ३०० वर्षांपर्यंत वयाचे असल्याने ते ऐतिहासिक वारसा वृक्ष (हेरिटेज ट्री) मानले जातात.

पर्यावरणप्रेमींच्या मते, शहराला प्राणवायू पुरवठा करणाऱ्या या झाडांवर कुऱ्हाड चालवून रस्ता रुंदीकरणाचा निर्णय घेतला जात आहे. मात्र, या प्रकल्पासाठी पर्यावरणीय परिणामाचा अभ्यास तज्ज्ञ समितीकडून करण्यात आलेला नाही. तसेच झाडांची तज्ज्ञांकडून प्रत्यक्ष पाहणीही झालेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. तज्ज्ञांच्या मते, सुमारे ८० वर्षे वयाचे एक झाड रोज किमान ५०० ते १००० लोकांना आवश्यक असणारा प्राणवायू पुरवते. या मार्गावर वाहतुकीमुळे प्रदूषणाचे प्रमाण मोठे असल्याने ही जुनी झाडे प्रदूषण शोषण्याचे महत्त्वाचे काम करतात. त्यामुळे ही झाडे तोडल्यास परिसरातील पर्यावरणीय समतोल बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

काही महिन्यांपूर्वी महानगरपालिकेने या मार्गावरील अतिक्रमणे हटविल्यामुळे रस्ता बराचसा मोकळा झाला आहे. पर्यावरणप्रेमींच्या म्हणण्यानुसार, पडेगाव मारुती मंदिर ते छावणी नाका या भागात सकाळी व संध्याकाळी फारतर अर्धा तास वाहतूककोंडी होत असते. तीही मुख्यतः वाहनचालकांच्या घाईमुळे आणि वाहतूक शिस्तीच्या अभावामुळे होत असल्याचे सांगितले जाते. याशिवाय या मार्गाला समांतर असलेला धुळे–सोलापूर महामार्ग बाहेरून येणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवत नसल्याचा दावा पर्यावरणप्रेमींनी केला आहे. तसेच पडेगाव परिसरात वाहतूक पोलिसांची नियमित उपस्थिती असल्यास कोंडी टाळता येऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले.

पर्यावरणप्रेमींच्या मते, झाडे तोडण्याऐवजी झाडे जपूनही रस्ता विकसित करता येऊ शकतो, असे अनेक देशांत केले जाते. मराठवाड्यात आधीच हरित क्षेत्र फक्त २ टक्के उरले असून, शहरात ते सुमारे ४ टक्के असल्याचे सांगितले जाते. दरवर्षी मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जात असल्याने शहर वाळवंटीकरणाच्या दिशेने जात असल्याची भीती मानद वन्यजीव सदस्य डॉ. किशोर पाठक, ॲड. निरंजन देशपांडे यांनी व्यक्त केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Road Widening Threatens Historic Trees; Environmentalists Protest in Sambhajinagar

Web Summary : Sambhajinagar road widening faces opposition due to the planned felling of old trees. Environmentalists argue for alternative solutions, citing minimal traffic issues and ecological damage. They propose preserving trees during development to avoid desertification.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरenvironmentपर्यावरण