शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

"गोली मार दूँगा!"; जमिनीच्या व्यवहारात दीड कोटी हडपून सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याला धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 12:40 IST

सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याची जमिनीच्या विक्रीत १.३३ कोटींची फसवणूक; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : १८.७ गुंठे जमिनीची दोन कोटींमध्ये विक्री करण्याच्या व्यवहारात सहा जणांच्या टोळक्याने सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्यांसह त्यांच्या मित्रांची तब्बल १ कोटी ३३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सिटी चौक ठाण्यात ७ मार्चला गुन्हा नाेंदविला आहे.

आरोपींमध्ये शेख इरफान शेख शफीक, त्याचा भाऊ शेख सलमान शेख शफीक, त्याची आई गौसिया बेगम शेख शफीक, त्याचे वडील शेख शफीक उर्फ शेख साहब (सर्व रा. सलमान हॉल, दिल्ली गेटजवळ), शेख जमील शेख गुलाम रसूल (३४, रा. रोजेबाग ईदगाह झोपडपट्टी) आणि शेख इम्रान शेख गफ्फार (रा. कैसर कॉलनी) या सहा जणांचा समावेश आहे. यातील जमील हा मुख्य आरोपी इरफानचा नोकर आहे. शहर पोलिस दलातून पोलिस उपनिरीक्षक पदावरून सेवानिवृत्त झालेले गोरख चव्हाण (रा. एकतानगर, जटवाडा रोड) यांच्या फिर्यादीनुसार त्यांचा मित्र यासीन खान महेमूद खान याने आरोपी इरफानची भेट घालून देत १८.७ गुंठे जमिनीचा व्यवहार २ कोटी रुपयांत ठरविला होता. त्यात चव्हाण यांचे २० लाख अडकले आहेत. उर्वरित सर्व रक्कम यासीन यांची आहे. यासीन हे जुन्या दुचाकी खरेदी - विक्रीचा व्यवसाय करतात. या प्रकरणाचा अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार करीत आहेत.

धनादेश दिले पण वटलेच नाहीतफेब्रुवारी २०२४मध्ये १ कोटी ३३ लाख रुपये दिल्यानंतरही आरोपी इरफान शेखसह त्याच्या सहकाऱ्यांनी जमिनीचे खरेदीखत करून दिले नाही. त्यामुळे २३ जुलै २०२४ रोजी चव्हाण आणि यासीन यांनी १०० रुपयांच्या बॉण्ड पेपरवर रजिस्टर नोटरी करून घेतली. त्यात व्यवहाराबाबत आणि दिलेल्या रकमेबाबत उल्लेख आहे. त्यानंतर आरोपी इरफानने फिर्यादींना वेगवेगळ्या रकमांचे आणि तारखांचे धनादेश दिले. मात्र, ते धनादेश संबंधित तारखांना वटले नाहीत. काही धनादेश तर बंद असलेल्या बँक खात्यांचे दिले होते.

ताबा घेण्यास जाताच शिविगाळआरोपींनी चव्हाण आणि यासीन यांना सलमान हॉल, बिल्डिंग क्र. २मधील दुकान क्र. ३ आणि ४ देण्याचा शब्द दिल्यावर यासीन हे दुकानाचा ताबा घेण्यासाठी गेले. तेव्हा आरोपी इरफानचा वडील शफीक याने त्यांना शिवीगाळ केली. तसेच, कंबरेची बंदूक काढत फिरसे इधर आया तो गोली मार दुँगा, असे म्हणून ये खिलोना नहीं है, इसका लायसन है मेरे पास, असे सुनावले. तसेच, इरफान हा चोरो का सरदार है, उसको तुम्हारे लिए ही छोडा है, मेरा सलमान बाहार है, वो यहा रहता तो तुम पैरो पर वापस नही जाते, असे म्हणून धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : "I'll shoot you!": Retired cop threatened over land deal fraud.

Web Summary : A retired police officer and his friend were defrauded of ₹1.33 crore in a land deal. The main suspect, Irfan, and his accomplices issued bounced checks and threatened them with a gun when confronted.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर