छत्रपती संभाजीनगर: सध्या राज्यभरात विविध ठिकाणी पोलिस भरती सुरू आहे. देशसेवा आणि समाजसेवेचे स्वप्न उराशी बाळगून पोलीस भरतीसाठी जिद्दीने तयारी करणाऱ्या २३ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना छत्रपती संभाजीनगरमधून समोर आली आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
मृत तरुणाचे नाव संग्राम धोंडीराम शिंदे (वय २३, मूळ रा. सांगली) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सुमारे ८.१५ वाजता ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालय (SP Office) येथील मैदानावर १६०० मीटर धावताना चक्कर येऊन संग्राम कोसळला.
संग्रामला तत्काळ मदत करण्यात आली, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या घटनेमुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये शोककळा पसरली असून, संग्रामच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Web Summary : A 23-year-old aspiring police officer, Sangram Shinde, collapsed and died while running the 1600-meter race during recruitment in Chhatrapati Sambhajinagar. He collapsed at the SP office ground and passed away before receiving treatment, casting a pall of gloom over fellow aspirants and his family.
Web Summary : छत्रपति संभाजीनगर में पुलिस भर्ती के दौरान 23 वर्षीय संग्राम शिंदे 1600 मीटर दौड़ते समय गिर पड़े और उनकी मौत हो गई। एसपी ऑफिस ग्राउंड पर गिरने के बाद इलाज से पहले ही उनकी मृत्यु हो गई, जिससे साथी उम्मीदवारों और उनके परिवार में मातम छा गया।