शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

छत्रपती संभाजीनगर पोलिसांचे टार्गेट 'नशेखोर' आणि विक्रेते, ५७ एजंटासह सेवन करणारे ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 11:48 IST

रविवारी रात्रीतून अमली पदार्थांचे ३४ तस्कर ताब्यात; कुख्यात गुन्हेगार अजय ठाकूरसह पत्नीचाही समावेश

छत्रपती संभाजीनगर : पालकमंत्र्यांच्या दट्ट्यानंतर एनडीपीएस पथक व गुन्हे शाखेने ४८ तासांत अमली पदार्थांचे विक्रेते व सेवन करणाऱ्या ५७ जणांना ताब्यात घेतले. यात साताऱ्यातील कुख्यात गुन्हेगार व एमडी ड्रग्जची विक्री करणाऱ्या अजय ठाकूर व त्याची पत्नी राणीलाही अटक करण्यात आली. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या आदेशावरून शनिवारपासून अंमली पदार्थांच्या सेवन करणारे व विक्रेत्यांविरोधात मोहीम उघडण्यात आली. शनिवारी रात्री २४ गुन्हे दाखल करत श्वानांच्या मदतीने तस्करांच्या घराची झाडाझडती घेतली. रविवारीदेखील विविध पथकांनी आणखी ३४ गुन्हे दाखल करत जवळपास ३८ जणांना ताब्यात घेतले. यात पाच अल्पवयीन मुलांचादेखील समावेश आहे.

११ दिवसांत पुन्हा अटक२० पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल असलेला, गुन्हेगारांची टोळी चालवणारा अजय दि. २२ जानेवारी रोजी वर्षभरानंतर कारागृहाबाहेर आला. त्यानंतर सासु, पत्नीसह पुन्हा सक्रिय झाला होता. निरीक्षक गीता बागवडे, उपनिरीक्षक अमाेल म्हस्के यांनी थेट त्याच्या घरी छापा टाकला. त्याच्या घरातून १.४३ ग्रॅम गांजा, नशेच्या १६०, १२ ग्रॅम एमडी ड्रग्जच्या ११ पुड्या मिळून आल्या. नारेगावचा कुख्यात तस्कर अनिल माळवे, अरुण शिनगारे, संतोष खरे, अशोक भालेराव, दीपक मलके व गुजरातच्या आयेशा नामक महिला हे रॅकेट चालवतात. या सर्वांना सहआरोपी करत अजय व त्याच्या पत्नीची घरापासून ठाण्यापर्यंत धिंड काढली.

नशेविरोधात मोहीम उघडलीपोलिस ठाणे - कारवायासिडको - ५जवाहरनगर - २जिन्सी - १सातारा - २एम. सिडको - ४एम. वाळूज - ४सिटीचौक - ३छावणी - ५वेदांतनगर - २हर्सूल - २क्रांतीचौक - १वाळूज - १मुकुंदवाडी -१बेगमपुरा - १

पुन्हा गुजरात कनेक्शनअजयने चौकशीत अमली पदार्थांची बहुतांश तस्करी गुजरातमधून आयेशा खान नामक महिलेच्या माध्यमातून होत असल्याची कबुली दिली. यापूर्वी सिडकाेतील एका गोळ्या विक्रेत्याने आयेशाचे नाव सांगितले होते. मात्र, शहर पोलिसांकडून त्याबाबत तपासच झाला नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर