शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सुट्टीचा आनंद ठरला जीवघेणा! सख्ख्या भावांसह तीन मित्रांचा तलावात बुडून मृत्यू, गावावर शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 11:53 IST

पोहायला गेले अन् परतलेच नाही; ९ तासांच्या अथक परिश्रमानंतर तलावातून काढले तिघांचे मृतदेह

सिल्लोड (छत्रपती संभाजीनगर): सिल्लोड तालुक्यातील नानेगाव येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. नानेगाव-जंजाळा मार्गावरील तलावात आंघोळीसाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश असून, या घटनेमुळे संपूर्ण नानेगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

नेमकी घटना काय?नाथषष्ठीच्या सुट्टीमुळे शाळा बंद असल्याने उमर अनवर बेमरोट (१० वर्षे), साद अनवर बेमरोट (७ वर्षे) आणि सरफराज सलीम देहेंगल (९ वर्षे) हे तिघे मित्र सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास गावाजवळील तलावावर आंघोळीसाठी गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही खोल भागात गेले आणि एकमेकांना वाचवण्याच्या नादात बुडाले. दुपारी २ वाजेच्या सुमारास जलपुरवठा कर्मचाऱ्याला तलावाच्या काठावर मुलांचे कपडे दिसून आल्यावर हा प्रकार उघडकीस आला.

९ तासांनंतर मृतदेह सापडलेग्रामस्थांनी तातडीने धाव घेऊन शोधमोहीम राबवली. तब्बल ९ तासांच्या अथक परिश्रमानंतर सोमवारी सायंकाळी ७ वाजता तिन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. रात्री ११ वाजता शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर स्थानिक कब्रस्तानात दफनविधी करण्यात आला.

पोलीस यंत्रणेची अनभिज्ञताइतकी मोठी घटना घडूनही अजिंठा पोलीस ठाण्यात याची कोणतीही नोंद नसल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची तक्रार प्राप्त झाली नसल्याचे पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांनी सांगितले. मात्र, एकाच वेळी तीन मुलांचा मृत्यू होऊनही पोलिसांना याची माहिती न मिळाल्याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Holiday joy turns deadly: Three friends drown in Nanegaon lake.

Web Summary : Three schoolboys drowned in a Nanegaon lake while swimming during a holiday. The victims included two brothers. Their bodies were recovered after nine hours of searching. Police claim no report was filed, raising questions.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारीdrowningपाण्यात बुडणे