शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रभाग रचना अंतिम; आराखड्यात किरकोळ बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 20:19 IST

काही ठिकाणी लोकसंख्येत बदल, राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेने आगामी निवडणुकीसाठी तयार केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेच्या आराखड्यावर आलेल्या ५५२ आक्षेपांवर गेल्या महिन्यात सुनावणी घेऊन प्रभाग रचना किरकोळ बदलांसह अंतिम केली. अंतिम प्रभाग रचना राजपत्रात प्रसिद्ध झाली असून, त्यावर रविवारी राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या.

काही प्रभागांतील वसाहतींची हद्द वाढल्याने एकूण लोकसंख्येत बदल झाला आहे, तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येत काही प्रभागांत वाढ, तर काही प्रभागांत कमी झाली आहे. महापालिकेने २३ ऑगस्ट रोजी प्रभाग रचना आराखडा प्रसिद्ध केल्यावर नागरिकांकडून ४ सप्टेंबरपर्यंतच्या मुदतीत ५५२ आक्षेप दाखल झाले. आक्षेप घेणाऱ्यांचे म्हणणे आयोगाने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांनी ऐकून घेतले. सुनावणीनंतर महापालिका प्रशासकांनी सर्व झोन अधिकारी, नगररचना विभागाचे अधिकाऱ्यांचे पथक नियुक्त करून पडताळणी केल्यानंतर शासनाला सुनावणीचा अहवाल सादर केला. निवडणूक आयोगाने ३ ऑक्टोबर रोजी अंतिम प्रभाग रचना आराखड्याला मान्यता दिल्यावर आराखडा संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे. प्रारूप आणि अंतिम प्रभाग रचना आराखड्यात नेमका काय बदल झाला, याचा शोध घेण्यासाठी इच्छुकांची टीम रविवारी सरसावली होती. दरम्यान, आराखड्यात किरकोळ बदल करून सुधारणा केल्याचा दिखावा शासन व पालिकेने केल्याचा आरोप विरोधकांनी केला.

अंतिम आराखड्यातील काही बदल असे--प्रभाग क्रमांक २ मध्ये भारत मातानगर एन-१२, छत्रपतीनगर, एन-२, सारा वैभव, महमूदपुरा, फरहतनगर, एन-१३ भागश:चा समावेश केला आहे.-प्रभाग क्र. ३ मध्ये गणेश कॉलनी भागश:, एन-१२ चाऊस कॉलनी, हिमायत बागेचा समावेश.-प्रभाग क्र. ८ मध्ये मारुतीनगर, भवानीनगर, नारेगाव भागश: वाढविला.-प्रभाग क्र. ९ मध्ये चिकलठाणा भागश:, सावित्रीनगर, पटेलनगर, वसंतनगर अंशत:, मिसारवाडी भागश: वाढविला.-प्रभाग क्र. १० मध्ये सावरकरनगर, अष्टविनायकनगर, मायवर्ल्ड आदी भागांचा समावेश आहे.

अंतिम रचनेवर राजकीय पक्ष काय म्हणतात...खूप मोठ्या प्रमाणावर बदल केलेले नाहीत, असे मत उद्धवसेनेचे महानगरप्रमुख राजू वैद्य यांनी व्यक्त केले. महायुतीच्या उमेदवारांना फायदा होईल, अशीच रचना आराखड्यात कायम ठेवल्याचा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख युसूफ यांनी केला.नियम व निकषानुसारच प्रभाग रचना झालेली आहे, असा दावा शिंदेसेनेचे राजेंद्र जंजाळ यांनी केला, तर आम्ही रचना वगैरे काही पाहत नाही, निवडणूक हेच लक्ष्य असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष किशोर शितोळे म्हणत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Ward Structure Finalized; Minor Changes in Plan

Web Summary : The final ward structure for the upcoming Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation elections has been released with minor changes after addressing 552 objections. Some ward boundaries and population demographics have shifted, sparking mixed reactions from political parties, with accusations of bias surfacing.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाElectionनिवडणूक 2024