शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगर मनपा निवडणुकीच्या प्रचाराला हिंसेची धार; तीन मोठ्या घटनांमध्ये गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 12:30 IST

बहिणीचा प्रचार करणाऱ्या भावावर शस्त्राने हल्ला, मुख्य हल्लेखोरावर तब्बल १४ गुन्हे दाखल

छत्रपती संभाजीनगर : मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात एकीकडे उमेदवारांचा प्रचार जोर धरत असताना दुसरीकडे वादाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. गरमपाणी परिसरात एका महिला उमेदवाराच्या भावाला प्रचार करताना तब्बल १४ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगाराने बॅनर फाडून शस्त्राने वार केला. तर कैलासनगरात उमेदवाराच्या प्रचार कार्यालयावर ज्वलनशील पदार्थ फेकून जाळण्याचा प्रयत्न झाला. याशिवाय एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील जिन्सी भागात प्रभाग क्रमांक १४ मधील आपल्या उमेदवारांसह पदयात्रेसाठी पोहोचले असता त्यांच्यावर एका गटाने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.

रिक्षाचालक असलेले मिथुन रतन जाधव (३५) यांची बहीण वर्षा जाधव (२८, दोघे रा. जयभीमनगर) या प्रभाग क्रमांक ५ मधून वंचित बहुजन आघाडीकडून महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवार आहेत. ६ जानेवारीला सायंकाळी मिथुन हे पक्ष, भोंगा, पक्षाचा ध्वज तसेच उमेदवार व नेत्यांची छायाचित्रे असलेल्या रिक्षातून बहिणीचा प्रचार करत होते. सायंकाळी पाचच्या सुमारास गरमपाणी परिसरात प्रचार सुरू असताना अरबाज करीम खान, अन्सार अन्सारी व अब्दुल समीर उर्फ गुड्डू (सर्व रा. गरमपाणी परिसर) यांनी त्यांना परिसरात न येण्याची धमकी दिली. त्यानंतर शस्त्राने रिक्षावरील बॅनर फाडून मिथुन यांच्या चेहऱ्यावर वार व मारहाण केली. मिथुन यांच्यासोबत असलेल्या किशोर वाघ यांनाही आरोपींनी मारहाण केली. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर मिथुन यांनी क्रांतीचौक ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून मारहाणीसह ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत अरबाज करीम खान, अब्दुल समीर उर्फ गुड्डू व अन्सार अन्सारी यांच्यावर पोलिस उपनिरीक्षक देविदास शेवाळे यांनी गुन्हा दाखल केला.

दोन दिवस पोलिस कोठडीतघटनेची दखल घेत सहायक पोलिस आयुक्त सागर देशमुख यांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. हल्लेखोरांचा शोध घेत अरबाज करीम खान (२८) याच्यासह अन्य दोघांना रात्री अटक केली. बुधवारी दुपारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त देशमुख यांनी दिली. अरबाजवर तब्बल १४ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

उमेदवाराचे प्रचार कार्यालय जाळण्याचा प्रयत्नराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रभाग क्रमांक १६ चे उमेदवार मयूर सोनवणे यांचे कैलासनगरात प्रचार कार्यालय आहे. ६ जानेवारीला काही पदाधिकारी व कार्यकर्ते कार्यालयाच्या मागील बाजूस झोपले होते. एफआयआरमधील आरोपानुसार, पहाटे ४:३० वाजता बाळू उर्फ योगेश मुळे याने प्रचार कार्यालयाला आग लावली. समोर राहणारे किशोर भुजबळ यांनी त्याला हा प्रकार करताना पाहिले. सीसीटीव्ही फुटेजमध्येही बाळू मंडपाला आग लावताना दिसून आल्याचा दावा करण्यात आला आहे. याप्रकरणी पक्षाचे पदाधिकारी योगेश शहाणे यांच्या तक्रारीवरून जिन्सी ठाण्यात बाळू उर्फ योगेश मुळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्लाएमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील बुधवारी दुपारी ०१:३० वाजेच्या सुमारास जिन्सी भागात प्रभाग क्रमांक १४ मधील आपल्या उमेदवारांसह पदयात्रेसाठी पोहोचले. पदयात्रा काही अंतरावर गेल्यानंतर समोरून काँग्रेसचे उमेदवार कलीम कुरैशी समर्थकांसह आले. एमआयएम- काँग्रेसचा मोठा गट समोरासमोर आला. एकमेकांविरोधात घोषणाबाजी सुरू झाली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. इम्तियाज जलील एका काळ्या रंगाच्या चारचाकीतून निघत असताना काही तरुणांनी त्यांच्या वाहनावरच हल्ला चढविला. या घटनेनंतर जिन्सी भागात तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी काँग्रेस उमेदवार हबीब कुरेशी, कलीम कुरेशीसह ५० जणांच्या जमावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Violence mars Aurangabad election campaign; crimes registered in three major incidents.

Web Summary : Aurangabad election violence: Candidate's brother attacked, office torched, and clash during MIM rally. Police intervened, filing cases against suspects.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Electionछत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक २०२६Crime Newsगुन्हेगारी