शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

गोळीबार करून पोलिसांसोबत झटापट भोवली, शुभम जाटसह आठ जणांच्या टोळीवर ‘मोक्का’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 11:27 IST

पोलिस आयुक्तांची प्रस्तावाला मंजुरी : ७ कुख्यात गुन्हेगारांसह ४८ जणांवर मोक्काची कारवाई

छत्रपती संभाजीनगर : भरदिवसा गोळीबार करून नंतर अटकेसाठी घरी गेलेल्या पोलिसांना थेट आव्हान देणे कुख्यात गावगुंड शुभम जाट याला महागात पडले आहे. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी बुधवारी शुभम व त्याच्या ८ जणांच्या टोळीवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाईस मंजुरी दिली आहे. यामुळे जाट याला जामीन मिळण्याचा मार्ग खडतर झाला असून, त्याच्यासह अन्य आठ जणांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

मोबाइल व मुलीच्या वादातून शुभम भिकूलाल जाट (३०) याने कुख्यात गुन्हेगार अजय कागडाचे नातेवाईक सचिन लाहोट (रा. मुकुंदवाडी) यांच्या घरावर टोळीसह सशस्त्र हल्ला चढवला. १९ जानेवारी रोजी सकाळी घडलेल्या या घटनेत जाटने दोन वेळेस गोळीबार केला. जाटसह मयूर संजय उनगे, शिवा रमेश भालेराव, गोल्या ऊर्फ विजय दिनकर धनई, मनोज संजय पडूळ, सागर राऊत, अमर ऊर्फ अतुल पवार यांना अटक करण्यात आली होती. जाटने २०१६ ते २०२५ दरम्यान गंभीर स्वरूपाचे १६ गुन्हे केले आहेत. पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, अशोक भंडारे, उपनिरीक्षक अर्जुन राऊत, रेशीम कोळेकर यांनी कारवाई केली.

यांचाही मोक्का कारवाईत समावेशशुभम जाटसह मयूर संजय उनगे (२१, रा. साईनगर), शिवा रमेश भालेराव (२०, रा. विश्रांतीनगर), विजय दिनक धनई (२४), मनोज संजय पडूळ (२५), सागर प्रशांत राऊत (२०), ज्ञानेश्वर उर्फ माऊली मनोहर यादव (३२, चौघे रा. जय भवानीनगर), अमर उर्फ अतुल गणेश पवार (४०, रा. जालना).

सलग सातवी मोक्काची कारवाईटोळी प्रमुख - इतर सदस्य१.अजय रमेश वाहूळ उर्फ ठाकूर (२९, रा. सातारा गाव) - ७२. मुकेश उर्फ मुक्या महेंद्र साळवे (२७, रा. मुकुंदवाडी) - ८३. रवी जगताप काळे (२८, रा. शिदी शिरसगाव, ता. गंगापूर) - ५४. सय्यद फेजल उर्फ तेजा (२७, रा. किलेअर्क) - ५५. शेख जावेद उर्फ टिप्या (३५, रा. विजयनगर) - ५६. सुमित सुभाष रुपेकर (२०, रा. साजापूर) - ३

English
हिंदी सारांश
Web Title : Firing, scuffle with police leads to MCOCA against Shubham Jat gang.

Web Summary : Shubham Jat and eight gang members face MCOCA charges after firing incident. They also challenged police during arrest. Jat has 16 prior offenses.
टॅग्स :MCOCA ACTमकोका कायदाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी