शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! २५ वर्षांची आई कचरा वेचण्यात मग्न, तिची १२ वर्षांची मुलगी मैत्रिणीसह बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 18:46 IST

कचरा वेचताना दोन मुली बेपत्ता; अनुचित प्रकाराच्या भीतीने पोलिसांसह कुटुंबीयही चिंताग्रस्त

छत्रपती संभाजीनगर : आईचे वय वर्षे २५. तिला पहिली मुलगी १२ वर्षांची तर दुसरे व तिसरे अपत्य अनुक्रमे ९ वर्षे व १४ महिन्यांचे. सोमवारी आई कचरा वेचण्यात मग्न असताना तिची १२ वर्षांची मुलगी आणि मैत्रिणीची दहा वर्षांची मुलगी, अशा दोन मुली अचानक बेपत्ता झाल्या. सोमवारी सायंकाळी नारेगावात घडलेल्या घटनेला ७२ तास उलटूनही मुली न सापडल्याने अनुचित प्रकार घडण्याच्या भीतीने पोलिसांसह कुटुंबीयही चिंताग्रस्त आहेत. बुधवारी रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी सिडको पोलिसांचे पथक सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे मुलींचा माग काढण्याचा प्रयत्न करत होते.

२५ वर्षीय तक्रारदार महिला कचरा वेचण्याचे काम करते. कचरा वेचण्यासाठी गेल्यानंतर त्या सर्व मुलींना सोबत घेऊन जातात. १ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता १२ वर्षांच्या मुलीसह नारेगावाच्या महानगरपालिका शाळेच्या परिसरात कचरा वेचण्यासाठी गेल्या होत्या. त्यांची मैत्रीणदेखील मुलीला घेऊन आली. कचरा वेचून झाल्यानंतर सायंकाळी ४:३० वाजता अन्य मुले, मुली परतली. मात्र या दोघी बेपत्ता झाल्या.

सर्वत्र शोध...कुटुंबाने दोघींचा नारेगाव, मिसारवाडी, चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत शोध घेतला. मात्र, त्या मंगळवारी देखील सापडल्या नाहीत. मंगळवारी दुपारी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात दोघींच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. फौजदार सतीश जोगस तपास करत आहेत.

असे आहे वर्णन...१० वर्षांची मुलगी साधारण ३ फूट उंचीची असून, सडपातळ बांधा, सावळा रंग, काळे डोळे असून, गालावर जुन्या जखमेचा व्रण आहे. तर १२ वर्षीय मुलगी ४ फूट उंच, सडपातळ बांधा, सावळा रंग व कपाळावर गोल गाेंदलेला ठिपका आहे. कोणाला आढळल्यास तत्काळ एमआयडीसी सिडको पोलिसांना कळवण्याचे आवाहन केले आहे.

जिल्हा पोलिसांसह रेल्वे पोलिसांशीही संपर्क-पोलिस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे मुली कुठल्या दिशेने गेल्यात, हे तपासण्याचा प्रयत्न करत हाेते. मात्र, बुधवारी रात्रीपर्यंत सुगावा लागलेला नव्हता.-एमआयडीसी सिडको पोलिसांनी जिल्हा पोलिसांना कळवून रेल्वे पोलिसांशीही संपर्क साधला.

वयामुळे संभ्रम, पोलिसही अचंबितही दोन्ही कुटुंबे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगतात. यात १२ वर्षांच्या मुलीच्या आईने वय २५ सांगितले. हे ऐकून पोलिसही अचंबित झाले. तिने वयाचा कुठलाही पुरावा सादर न केल्याने तसेच वय नमूद केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरणchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर