शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरच्या फळविक्रेत्याचा अहिल्यानगरमध्ये खून; १२ दिवसांनंतर गुन्ह्याची उकल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 19:07 IST

व्यावसायिक वादातून खून करून मृतदेह जाळला; पोलिसांना १२ दिवसांनंतर गुन्ह्याची उकल करण्यात यश

छत्रपती संभाजीनगर/ पारनेर (जि. अहिल्यानगर) : व्यावसायिक वादातून फळविक्रेत्याचा खून करून मृतदेह रस्त्याच्या कडेला जाळून टाकल्याची घटना सुपा परिसरात उघडकीस आली. सुपा पोलिसांनी १२ दिवसांत गुन्ह्याची उकल करून आरोपीला ताब्यात घेतले आहे. मृत व आरोपी दोघेही छत्रपती संभाजीनगरचे असून व्यावसायिक वादातून हा खून झाल्याचे तपासात समोर आले आहे.

युनूस सत्तार शेख (वय ३६, मूळ रा. छत्रपती संभाजीनगर, हल्ली रा. हडपसर, पुणे) असे मयताचे नाव आहे. व्यवसायानिमित्त तो पुण्यात राहत होता. याप्रकरणी छत्रपती संभाजीनगरचा व्यावसायिक प्रदीप प्रभाकर शरणागत (वय २४) याला सुपा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुपा पोलिस ठाण्याच्या हद्दीत १८ जून रोजी नारायणगव्हाण कुकडी कॅनॉलच्या कडेला एका पुरुषाचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता.

१२ दिवसांनंतर गुन्ह्याची उकल; मृतदेह जाळला होतायाप्रकरणी सुपा पोलिस ठाण्यात १९ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. सुपा पोलिसांनी अनेक पुराव्यांच्या आधारे मयताचा मित्र प्रदीप शरणागत याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. युनूस शेख व आरोपी प्रदीप खूप दिवसांपासून पुण्यातील भेकराईनगरमध्ये फळ विक्रीचा व्यवसाय करत होते. परंतु त्यांच्यात व्यवसायातून वाद झाले. त्यातून आरोपी प्रदीप याने युनूस शेखचा डोक्यात दगड घालून खून केला. नंतर त्याचा मृतदेह कारमध्ये टाकून छत्रपती संभाजीनगरला घेऊन जात असताना पुणे-नगर महामार्गावर नारायणगव्हाण शिवारात टाकला. ओळख पटू नये या उद्देशाने डिझेल टाकून मृतदेह जाळला व तो तेथून पळून गेला. सुपा पोलिसांना हा मृतदेह आढळल्यानंतर त्यांनी तपास सुरू केला. जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सुप्याचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे, उपनिरीक्षक मोनिका जेजोट व त्यांच्या पथकाने गुन्ह्याची उकल केली.

चार पथकांची नियुक्तीसुपा पोलिसांनी ४ पथके तयार करून नगर जिल्ह्यालगत सोलापूर, सातारा, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीडमधील पोलिस स्टेशनला हरवले असल्याबाबत कळवले होते. दरम्यान, पुणे शहरातील फुरसुंगी पोलिस स्टेशनला युनूस शेख हा मिसिंग असल्याची तक्रार दाखल होती. त्यातील मयताचे वर्णन मिळतेजुळते आल्याने या गुन्ह्याची उकल करण्यात सुपा पोलिसांना यश मिळाले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर