Chhatrapati Sambhajinagar :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फारोळा गावातून एक विचित्र घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी या गावात एक अशी घटना घडली, ज्यामुळे अख्खं गाव दहशतीत असून, रेबीजचे इंजेक्शन घेण्यासाठी रुग्णालयात रागां लावत आहे. नेमका काय प्रकार आहे? जाणून घेऊ...
मिळालेल्या माहितीनुसार, आठ दिवसांपूर्वी या गावातील एका गायीच्या वासराला पिसाळलेला कुत्रा चावला अन् काल सकाळी वासराचा मृत्यू झाला. वासरू ज्या गायीचे दूध पित होते, त्या गाईच्या दुधाचा गावातील अनेकांना पुरवठा होत असे. वासरामुळे गाईला इन्फेक्शन झाल्याने आपल्यालाही होईल, अशी अफवा गावात पसरली.
घाबरुन अख्ख गाव शासकीय रुग्णालयात रेबीजच इंजेक्शन घेण्यासाठी पोहचेले. शुक्रवारपासून गावातील जवळपास सर्वच नागरिकांनी बिडकीनच्या शासकीय रुग्णालयात इंजेक्शन घेण्यासाठी रांगा लावल्या. मात्र एवढ्या गर्दीला पुरेल एवढा इंजेक्शनचा साठा देल रुग्णालयात उपलब्ध नाही, त्यामुळे रुग्णालयात गोंधळाची स्थिती आहे.
एक वर्षांपूर्वी याच गावात अशीच एक घटना घडली होती. एका गायीच्या वासराला कुत्रा चावला, हा तरुण वासराच्या संपर्कात आला आणि काही दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे पुन्हा अशी घटना घडू नये, म्हणून गावकरी इंजेक्शन घेण्यासाठी रुग्णालयात धाव घेत आहे. डॉक्टरांनी सांगितले की, आतापर्यंत शेकडो लोकांनी इंजेक्शन घेतले आहे.