शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मनपाचे पथक जाताच शहागंजमध्ये पुन्हा अतिक्रमणांचा विळखा; १०० हून अधिक हातगाड्या 'जैसे थे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 12:58 IST

सकाळी मनपाचा धडाका, दुपारी पुन्हा हातगाड्यांचा राडा; शहागंजमध्ये परिस्थिती 'जैसे थे'

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने गुरूवारी सकाळी ११:३० वाजल्यापासून अचानक शहागंज चमन भागात कारवाईला सुरूवात केली. त्यामुळे या भागातील हातगाडी चालकांनी परिसरातील विविध गल्लीबोळांत धूम ठोकली. महापालिकेच्या गळाला हातगाडी चालक लागलेच नाहीत. चमनच्या आसपास आणि क्लॉक टॉवर येथील चप्पल गल्लीतील ३० पेक्षा अधिक शेड मनपाने पाडल्या. या कारवाईमुळे हातगाडी चालक, व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली.

बुधवारी सायंकाळी शहागंज चमन येथे ४ हातगाडी चालकांनी एका गर्भवती महिलेसह तरुणाला बेदम मारहाण केली. या प्रकरणी रात्री उशिरा सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपींना अटकही करण्यात आली. या घटनेनंतर येथील अतिक्रमणांचा मुद्दा ऐरणीवर आला. महापालिकेतील सत्ताधारी शिंदेसेनेने या प्रकरणात उडी घेतली. अतिक्रमणांवर कारवाई करावी, अशी मागणी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी रात्रीच आयुक्तांना केली.

सकाळी ११ वाजता अतिक्रमण हटाव विभागाला बोलावण्यात आले. या विभागाचे सनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे, उपायुक्त सविता सोनवणे यांच्यासह वॉर्ड अधिकारी, इमारत निरिक्षक सय्यद जमशीद आदींनी ११:३० वाजता कारवाईला सुरुवात केली. मनपाचे पथक पाहताच फळ विक्रेत्यांनी तर अक्षरश: मिळेल त्या रस्त्याने धूम ठोकली. १०० पेक्षा अधिक हातगाडी चालकांनी पळ काढला. त्यानंतर मनपाच्या पथकाने चमनसमोरील एका फळ विक्रेत्यावर कारवाई केली. त्याचे बरेच सामान रस्त्यावर आले होते. चप्पल गल्लीतील व्यापाऱ्यांनी दुकानांसमोर शेड उभारल्या होत्या. ३० पेक्षा अधिक शेड मनपाने काढल्या.

एका तासानंतर हातगाड्यामहापालिकेचे पथक १:३० च्या सुमारास शहागंज येथून बाहेर पडले. त्यानंतर २:३० वाजता शहागंज मशीद रोड, हिंदी भवन रोड, किराणा चावडीकडे जाणारा रस्ता आदी ठिकाणी हातगाडी चालकांनी पुन्हा अतिक्रमण केले. दररोज ज्या पद्धतीने बेशिस्त हातगाड्या लावण्यात येतात त्यामध्ये आज थोडीशी शिस्त दिसत होती.

रस्ता मोकळा ठेवावा लागेलशहागंज चमन परिसरातील सर्वच रस्ते २४ तास मोकळे असायला हवेत. मुख्य रस्त्यावर हातगाडी चालक असतील किंवा दुकानांच्या समोर असलेले अतिक्रमण निश्चित काढले जाईल. व्यापाऱ्यांनीही थोडी शिस्त पाळायला हवी.संतोष वाहुळे, अतिक्रमण सनियंत्रण अधिकारी, मनपा

दोन वर्षांपूर्वीही कारवाईमहापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने दोन वर्षांपूर्वी शहागंज चमन भागात मोठी कारवाई केली होती. पुन्हा रस्त्यावर अतिक्रमण होऊ नये म्हणून मनपाचे माजी सैनिकही काही दिवस या भागात तैनात करण्यात आले होते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Encroachments Return to Shahaganj After Municipal Action; Status Quo Remains

Web Summary : Following action against illegal vendors in Shahaganj, encroachments returned quickly. Municipal authorities removed sheds, but vendors resumed operations. Previous action two years ago yielded similar results. Officials emphasize the need to maintain clear roads.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारीEnchroachmentअतिक्रमणMunicipal Corporationनगर पालिका