शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत समिती उपाध्यक्षपद देईल त्यासोबत उद्धवसेना? शिंदसेनेकडून धक्कातंत्राची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 13:59 IST

यासाठी अध्यक्षपदासाठी इच्छुक पक्षाच्या उमेदवारांसोबत गोपनीय चर्चा सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

छत्रपती संभाजीनगर: जिल्ह्यातील ९ पंचायत समितींचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी मंगळवारी (दि.१०) निवडणूक होत आहे. या निवडणुकीत जो पक्ष उपाध्यक्षपद देईल, त्या पक्षासोबत जाण्याची तयारी उद्धवसेनेने केली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. यासाठी अध्यक्षपदासाठी इच्छुक पक्षाच्या उमेदवारांसोबत गोपनीय चर्चा सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पंचायत समितीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष आज ठरणारमागील महिन्यात पार पडलेल्या निवडणुकीत उद्धवसेनेचे जिल्हा परिषदेत ९ तर पंचायत समिती निवडणुकीत ११ सदस्य निवडून आले आहेत. उद्या १० मार्चला पंचायत समिती अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत उद्धवसेनेच्या उमेदवारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. यामुळे उद्धवसेनेने आपल्या उमेदवाराला उपाध्यक्षपद देणाऱ्या पक्षाच्या उमेदवाराला अध्यक्षपदासाठी पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीमध्ये उद्धवसेनेचे ४, गंगापूरमध्ये २, खुलताबाद, वैजापूर, कन्नड, सोयगाव आणि फुलंब्री पंचायत समितीमध्ये प्रत्येकी एक सदस्य आहे.

...तर शिंदेसेनेसोबत जाऊ शकते उद्धवसेनासंभाजीनगर पं.स. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला धक्का देण्याच्या तयारीत शिंदेसेना आहे. उद्धवसेनेच्या चार सदस्यांना सोबत घेऊन शिंदेसेना सभापतिपद मिळविण्याच्या तयारीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पैठण पंचायत समिती निर्विवाद शिंदेसेनेकडेपैठण पंचायत समिती निवडणुकीत शिंदेसेनेचे सर्वाधिक सदस्य आहेत. या पंचायत समितीचे सभापती व उपसभापतिपदी शिंदेसेनेचा उमेदवार बिनविरोध विजयी होऊ शकतो.

पंचायत समितीवर कोणाचा झेंडा?पंचायत समित्यांचे सभापती व उपसभापतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जाहीर केला. पीठासन अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे.ग्रामविकास विभागाने पत्र पाठवून २० मार्चपूर्वी जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्ष, पं. स.चे सभापती आणि उपसभापती निवडण्याचे निर्देश दिले आहेत.सभापती, उपसभापती निवडीसाठी दुपारी २:०० वा. विशेष सभेचे आयोजन करण्यात येईल. सभेच्या दोन तास आधी सभापती, उपसभापती पदासाठी नामांकन स्वीकारण्यात येतील. सभेसाठी गणपूर्ती होण्यासाठी एक तृतीयांश सभासद बैठकीला उपस्थित राहणे आवश्यक असेल. ९ जानेवारीला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एक महिन्याने सभापती, उपसभापती निवडणुकीचा कार्यक्रम ठरला. निश्चित केलेल्या आरक्षणानुसार ही निवडणूक होणार आहे.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरBJPभाजपाShiv Senaशिवसेना