शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय आयुक्तालय विभाजनास पुन्हा हवा; दहा वर्षांपूर्वीच्या अहवालावरील धूळ झटकणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 16:26 IST

छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि नांदेड या तीन जिल्ह्यांत आयुक्तालयाचे त्रिभाजन व्हावे की, विभाजन करावे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा विभागीय आयुक्तालयाचे विभाजन करण्याच्या मुद्याला दहा वर्षांनंतर हवा मिळाली आहे. तत्कालीन विभागीय आयुक्त उमाकांत दांगट समितीने आयुक्तालयाच्या त्रिभाजनाचा अहवाल शासनाला देऊन दशक लोटले. त्यानंतर आता पुन्हा छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि नांदेड या तीन जिल्ह्यांत आयुक्तालयाचे त्रिभाजन व्हावे की, विभाजन करावे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, त्रिभाजनाच्या अहवालावरील धूळ विद्यमान सरकारच्या काळात झटकणार काय, असा प्रश्न आहे.

खा. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना, त्यांनी विभागीय आयुक्तालय नांदेड येथे व्हावे, यासाठी पुढाकार घेतल्यानंतर विलासराव देशमुख आणि चव्हाण यांच्यातील मतभेद वाढले होते. गेल्या दीड दशकातील घडामोडीनंतर आता पुन्हा आयुक्तालय विभाजनाचा मुद्दा ऐरणीवर आला तो नांदेड येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे. बावनकुळे हे दोन दिवसांपूर्वी नांदेड येथे पक्ष बैठकीला गेले होते. त्यावेळी त्यांनी विभागीय आयुक्तालयाचे विभाजन करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे म्हटले होते.

जिल्ह्यांची निर्मिती करावी लागेल..संयुक्त महाराष्ट्रात मराठवाडा बिनशर्त सामील झाला, त्यावेळी सहा जिल्हे होते. सध्या मराठवाड्यात आठ जिल्हे आहेत. १९८१ साली छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) विभाजन करून जालना जिल्हा आणि पुढे १९९९ साली परभणीचे विभाजन करून हिंगोली जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. २०२० मध्ये लातूर, बीड आणि नांदेड जिल्ह्याच्या विभाजन करण्याचा मुद्दा चर्चेत होता. सध्या छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांचा मराठवाडा प्रादेशिक विभाग आहे. विभागीय आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर येेथे आहे. विभागात जिल्ह्यांची संख्या वाढवून आयुक्तालयाचे त्रिभाजन करण्याबाबत १० वर्षांपूर्वी समितीने दिलेल्या अहवालावर शासनाने अद्याप निर्णय घेतलेला नाही.

विभागीय आयुक्तालयाच्या त्रिभाजनाचा अहवाल दिला होताविभागीय आयुक्तालय नांदेड किंवा लातूर येथे करण्याच्या राजकीय वादानंतर शासनाने सेवानिवृत्त सनदी अधिकारी डॉ. उमाकांत दांगट यांच्या नेतृत्वात समिती नेमली होती. डॉ. दांगट यांना विचारले असता ते म्हणाले, त्रिभाजनाचा अहवाल शासनाकडे दिला होता.

टॅग्स :Divisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरNandedनांदेडlaturलातूर